°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अमळनेर - येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. सुधीर पाटील, माजी प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी,प्रा.धर्मसिंह पाटील,सिनेट सदस्य दिनेश नाईक हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रा.डॉ. विजय तुंटे यांनी आपल्या भाषणात संविधानाची निर्मिती प्रक्रीया,आजच्या काळात आवश्यकता व महत्त्व या संबंधी मौलीक मार्गदर्शन केले. त्यानंतर उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रा.डॉ.धीरज वैष्णव,ग्रंथपाल प्रा.डी.आर.पाटील,प्रा.अतुल पाटील (धुळे),रविंद्र व्यास,पंडित नाईक आदींसह कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.राधिका पाठक यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश नाईक यांनी केले.
No comments
Post a Comment