शहरातून जाणा-या मार्गाची दुरावस्था - त्वरित दुरूस्ती न झाल्यास आंदोलन जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य पंकज चौधरी यांचा प्रशासनास इशारा

Tuesday, December 1, 2020

/ by Amalner Headlines
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
               - * जाहीरात * -
----------------------------------------------------------------------------
अमळनेर -
शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणा-या धुळे - चोपडा रस्त्याचे सध्या कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.तसेच दगडी दरवाजाचे याच रस्त्यालगत काम सुरू असल्याने या रस्त्यावरून होत असलेली वाहतूक गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे.या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी अशी मागणी जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य पंकज चौधरी यांनी प्रशासनाकडे केली आहे.    
        याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरालगत राज्य मार्ग १५ चे हायब्रीड अँम्युनीटी अंतर्गत उच्च दर्जाचे काम सुरू आहे.सदर काम सुरू असतांना दगडी दरवाजाचे देखील काम सुरू असल्याने सदर रस्त्यावर परिमाणापेक्षा जास्त वजनाची वाहतूक देखील रा.मा. ०६ वरून  वळवण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याची चाळण झाली आहे.विशेष म्हणजे सदर रस्ता हा नगरपरिषद कार्यालयाच्या समोरुन जातो तरी देखील नगर परिषद फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.शहरात वाहनांची मोठी वर्दळ सुरू असल्याने दाट वस्ती, व्यावसायिक परिसर धुळीने संपूर्ण आच्छादला जात आहे.त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांताधिकारी,नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले आहे.   शहरात प्रवेशास एकमेव रस्ता असतांना प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी ह्याच मार्गाचा वापर करत असतील,त्यांना ही दुरावस्था दिसत असेल पण कदाचित जे लोकप्रतिनिधी, अधिकारी हवाई मार्गाने प्रवास करत असतील तर त्यांना हे दिसत नसेल अशी उपहासात्मक विनंती केली आहे.काही ठिकाणी तर रस्त्यामध्ये सुमारे २ - ३ महिन्यापासून गटारी वरील ढापे तुटल्याने खड्डा पडल्याने वाहतुकीला त्रास होऊन लहान मोठे अपघात होत आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या दुरावस्थाकडे राजकीय भावनेने व द्वेषापोटी हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप श्री चौधरी यांनी केला असून येत्या आठ दिवसात प्रमुख खड्डे व डागडुजी जर सार्वजनिक बांधकाम विभाग, व नगरपरिषदेने करावी अशी मागणी केली आहे. दुरूस्ती केली नाही तर सर्व समावेशक आंदोलन करू व रा.मा.०६ वरील वाहतुक आम्ही बंद करू असा इशारा जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंकज चौधरी यांनी प्रांताधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines