======================================
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अमळनेर - दिव्यांग नागरिकांना पिवळी शिधापत्रिका व अंत्योदय योजनेंतर्गत दरमहा ३५ किलो अन्न धान्य मिळणार असल्याचे आदेश नुकतेच केंद्र शासनाकडून देण्यात आले असतांना ना.बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील प्रहार अपंग क्रांती संस्थेचे शहराध्यक्ष योगेश पवार,प्रा.जयश्री दाभाडे यांनी तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांची भेट घेऊन दि. १७ जुलै २०१३ च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी व्हावी. संस्थेने दि.२३ जानेवारी २०२० रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे तालुक्यातील सर्व दिव्यांगांना बीपीएल पिवळी शिधापत्रिका व अंत्योदय योजना नुसार दरमहा ३५ किलो धान्य मिळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. तालुक्यातील बहुतांश दिव्यांग व्यक्तींकडे अजून पिवळी शिधापत्रिका नाही. त्यामुळे शासनाच्या या योजनेपासून अनेक दिव्यांग व्यक्ती वंचित न रहाता त्यांना हक्काचे रेशन मिळावे या मागणीचा प्रहार ने दि.१३ नोव्हेंबर रोजी लेखी खुलासा मागीतला होता.
अमळनेरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दि.१९ नोव्हेंबर २०२० रोजी सदरील दिव्यांग विषयावर चर्चा करून लवकरात लवकर दिव्यांगांना पिवळी शिधापत्रिका देण्यात येईल, तसेच जे दिव्यांग या योजने पासून वंचित आहेत त्यांच्यासाठी दि. ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनापासून या योजनेला सुरवात करण्यात येईल असे सांगून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिव्यांगांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात प्रहार अपंग संघटना शहराध्यक्ष योगेश पवार ,प्रा जयश्री दाभाडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करून लेखी पत्र देण्यात आले.
No comments
Post a Comment