अमळनेर नपा शिक्षण मंडळाच्या वंचित पेन्शन धारकांचे आ.अनिल पाटलांना साकडे जुलै पासून पेन्शन नाही जेष्ठ नागरिक हवालदिल, आमदारांनी दिले न्यायाचे आश्वासन

Wednesday, November 18, 2020

/ by Amalner Headlines
=========================================
            - * जाहीरात * -
=========================================
अमळनेर-
येथील  नगरपरिषदेकडून नियमित सेवानिवृत्ती व कुटूंबनिवृत्ती वेतनासाठी नगर परिषद हिस्सा अनुदान येथील शिक्षण मंडळास मिळत नसल्याने गेल्या जून महिन्यापासून निवृत्तीवेतन मिळत नसल्याने निवृत्तिवेतन धारकांनी दिवाळीच्या पर्वावरच आ.अनिल पाटील यांचे निवासस्थान गाठत त्यांना साकडे घातले. काहीही करा पण आमचा वेतनाचा प्रश्न सोडवाच अशी याचनाच सर्वांनी केल्याने आमदारांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे.
            गेल्या पाच महिन्यापासून आम्ही वेतनाविना असतांना आमच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत,पालिका अधिकारी व पदाधिकारी लक्ष देत नाही.
शिक्षण मंडळाचे पदाधिका-यांनी  देखील प्रयत्न करून पाहिला.पण  मग आम्ही न्याय मागायचा तरी कुणाकडे अशी भावना आमदारांकडे या पीडित निवृत्त शिक्षकांनी व्यक्त केली.यावेळी त्यांच्यासोबत नागरी हित दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा अशोक पवार उपस्थित होते.
यावेळी आमदारांना निवेदन देण्यात आले. 
         निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार येथील न.प. ने शिक्षण मंडळाला अनुदान दिलेले नसल्याने सेवानिवृत्ती वेतन धारकांचे माहे जुले २०२०  पासुन आजपर्यतचे पेन्शन झालेले नाही. मंडळाचे सर्व सेवानिवृत्ती वेतनधारक ६५ ते  ८५ वय वर्ष तर काही पेन्शनर हे ८५ ते ९० वर्ष वय असलेले म्हातारे व वयस्कर महिला/पुरुष आहेत.पाच महिन्यापासून सेवानिवृत्ती वेतन नसल्याने व सद्यस्थितीत कोरोना सारखा गंभीर आजार असल्याने औषधोपचारासाठी सर्वाना पैशांची नितांत गरज आहे. चार महिने उलटुन ही आजपावेतो माहे जुलै २०२० ते आजपावेतोचे सेवानिवृत्ती वेतन मिळालेले नाही. औषधोपचारामुळेच ७८ सेवानिवृत्ती वेतनधारकांचे निधन झालेले आहे. अशा परिस्थितीत शिक्षण मंडळाकडे वारंवार तगादा लाऊन विचारणा केली असता प्रशासन अधिकारी यांच्याकडील पत्रानुसार नगरपरिषद अमळनेर यांचेकडे जुलै २०१९ ते जुलै २०२० या कालावधीचे रक्कम ८७,५२,८८१/- एवढे अनुदान मिळणे बाकी असल्याचे समजते.तसेच मुख्याधिकारी यांनीही आमच्या समस्या समजुन घेतल्या नाहीत व शिक्षण मंडळाने मागणी केलेप्रमाणे अनुदान देण्यास टाळाटाळ केलेली असल्यामुळे निवृत्ती वेतन झालेले नाही.प्रत्यक्षात शिक्षण मंडळास  १० टक्के देय असलेले अनुदान शासनाकडुन नगरपरिषदेस प्राप्त होत गेलेले असतांनाही शासनाच्या नियमाप्रमाणे सदर अनुदान नगरपरिषदेने शिक्षण मंडळाकडे पाठविणे आवश्यक असतांना नगरपरिषदेने पगार व पेन्शनवर खर्च न करता इतर अनावश्यक बाबीकडे अनुदान खर्च केलेले आहे. तरी या बाबीकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
पुढील अनुदानातून व्यवस्था करणार मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही
             आ.अनिल पाटील यांनी वयोवृद्ध शिक्षकांच्या भावना लक्षात घेत नगराध्यक्षांशी याबाबत चर्चा करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. तसेच तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधल्यानंतर नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना देखील विलंबाची कारणे विचारून या प्रकाराबाबत खंत ही व्यक्त केली.मुख्याधिकारी यावर निरुत्तर झाल्या. त्यांनी नगराध्यक्षांशी चर्चा करून पुढील महिन्याच्या अनुदानातून शिक्षण मंडळास अनुदान दिले जाईल अशी ग्वाही दिली.यावेळी अनेक निवृत्त शिक्षक उपस्थित होते.
========================================

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines