=========================================
अमळनेर- तालुक्यांतील आदर्श गाव सुदंरपट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. शिवसेनेचे उपनेते,जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाळधी येथे भगवा फटका घालून सुरेश पाटील यांचा शिवसेना पक्ष प्रवेश झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,अमळनेर तालुका प्रमुख विजू मास्तर,शहरप्रमुख संजय पाटील उपस्थित होते.

श्री सुरेश पाटील हे अमळनेर तालुका सरपंच संघाचे अध्यक्ष असून सुंदरपट्टी ग्रामपंचायतीत त्यांचे पूर्ण पॅनल विजयी झालेले आहे. लवकरच त्यांचे सोबत तालुक्यांतील अनेक सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व विविध सोसायटी सदस्य मोठ्या कार्यक्रमाद्वारे प्रवेश घेणार आहेत. त्यांच्या प्रवेशाने ग्रामीण भागात शिवसेना वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे. अमळनेर शिवसेना पदाधिका-यांनी त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे.
No comments
Post a Comment