भाजपा नेते स्व.उदय वाघ यांचा २८ ला प्रथम स्मृतीदिन अमळनेर शहरात सर्व पक्षीय आदरांजली सभेचे आयोजन

Thursday, November 26, 2020

/ by Amalner Headlines
``````````````````````````````````````````
             - * जाहीरात * -
````````````````````````````````````````
अमळनेर -  जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे नेते स्व. उदय वाघ यांचा दि. २८ नोव्हेंबर रोजी प्रथम स्मृतीदिन आहे. यानिमित्त अमळनेर शहरात सर्व पक्षीय आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 
                    मागील वर्षी दि.२८ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात भाजपाच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात असलेले मुरब्बी राजकारणी उदय वाघ यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली.त्यांच्या आठवणींना ऊजाळा मिळावा म्हणून दि.२८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता
अमळनेर येथील कृ.ऊ.बा. समिती समोरील ट्रक टर्मीनस येथील पटांगणावर सर्व पक्षीय आदरांजली सभा होणार आहे.तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील उदयोन्मुख नेतृत्वाला आदरांजली वाहण्यासाठी अमळनेर तालूका व शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,सामाजिक संस्था,संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनीही या आदरांजली सभेस उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
`````````````````````````````````````

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines