•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अमळनेर - आपल्या विविध मागण्यांबाबत शासकीय कर्मचारी संघटनेने काल संप पुकारला होता. या संपास अमळनेर येथे १००% प्रतिसाद मिळाला.शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. शासकीय कर्मचा-यांच्या जुनी पेन्शन योजना,कंत्राटी पद्धत या व इतर मागण्यांबाबत हा संप पुकारला होता. या संपात महसूल विभाग,शिक्षक संघटना,जिल्हा परिषद,विज वितरण कंपनी या विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
महसूल कर्मचारी संघटना
अमळनेर येथील महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद ठेवून संपात सहभाग घेतला. सर्व कर्मचा-यांनी एकत्र येत संविधान दिनानिमित्त संविधानाची उद्देशिका सामूहिकपणे म्हटली. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आले. यावेळी दिनेश सोनवणे,राजेंद्र शिरसाठ,संदीप पाटील,विजय धमके,अमोल पाटील,बागुल,
कपिल पाटील,सुनिल गरूडकर, मैराळे,चव्हाण आदींची उपस्थिती होती.
याशिवाय जि.प.कर्मचारी,शिक्षक संघटना,ग्रामसेवक संघटना,विज वितरण कर्मचारी यांनीही संपात सहभाग नोंदवला.त्यामुळे शासकीय कार्यालये ओस पडली होती.
No comments
Post a Comment