मुंबई कॉंग्रेस कमिटीच्या जॉईंट सेक्रेटरीपदी राजेंद्र सुतार यांची निवड मित्र परिवाराने केला अभिनंदनाचा वर्षाव

Tuesday, December 1, 2020

/ by Amalner Headlines
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
              - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------------
मुंबई -
मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांनी मुंबई काँग्रेस कमिटीच्या जॉईंट सेक्रेटरीपदी राजेंद्र माधवराव सुतार यांची नुकतीच नियुक्ती केली आहे.सध्या राजेंद्र सुतार हे  मुंबईचे रहिवासी असले तरी ते मूळचे अंमळनेरचेच.
           श्री राजेंद्र सुतार हे १९७६ पासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठपणे जोडलेले आहेत. विद्यार्थी दशेत महाविद्यालयात असताना एनएसयूआय,युवक काँग्रेसमधून अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यानंतर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी आणि जळगाव जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मुंबई काँग्रेस कमिटीने त्यांच्यावर नव्याने जबाबदारी सोपविलेली आहे. श्री सुतार यांच्या काँग्रेस पक्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ नेत्यांचे सहकार्य व मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. त्यात माजी खासदार भाऊसाहेब के.एम. पाटील, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष कै. मधुकरराव चौधरी, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कै.अख्तर अली   काझी,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कै.आबासाहेब के. डी. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष कै. प्राध्यापक व्हि. जी. पाटील, अमळनेरचे माजी शहराध्यक्ष लोटन आण्णा चौधरी, माजी तालुकाध्यक्ष कै. बाळासाहेब दाभाडे व माजी जिल्हा उपाध्यक्ष कै.माधवराव मराठे, युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी जनरल सेक्रेटरी किशोरशेठ ललवाणी, माजी नगराध्यक्ष कै. सुरेशशेठ ललवाणी, कृषी उत्पन्न बाजार समिती व पंचायत समितीचे माजी सभापती भैय्यासाहेब पाटील, उपसभापती कै.काशिनाथ बुधा पाटील, माजी आमदार अमृत आप्पा पाटील, माजी नगराध्यक्ष रतनशेठ पहाडे तसेच काँग्रेस भवनचे ट्रस्टी कै.शंकर नाना शिंपी,कै. गुलाब शेट सोनार (विंचुरकर) कै. अंतूशेट कासार, त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी उपसभापती कै.दाजीबा पाटील माजी आमदार मधुकरराव पाटील, पूज्य साने गुरुजींचे शिष्य अब्बास भाई बोहरी, डॉ. आर. जे. तात्या पाटील,कै. हकीम उद्दीन शेठ बोहरी, डॉ.रमेश पाटील, कै. त्रिभुवनदास वेलजी गोहील, कै. नेमीचंदशेठ जैन, कामगार नेते कै. रामभाऊ संदानशिव, स्कूल बोर्डाचे माजी सभापती कै. रामचंद्र आप्पा लांडगे आदी मान्यवर व्यक्तींचा राजेंद्र सुतार यांच्या राजकीय जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे
त्यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे सर्वश्री मकसूदभाई बोहरी, पुणे येथील माजी असिस्टंट पोलीस कमिशनर राजेंद्र भामरे, माजी जिल्हा न्यायाधिश गुलाबराव पाटील, डॉ.अनिल शिंदे,मनोज पाटील, जगदीश चौधरी, अॅड.सलीम खान,अॅड. विजय ढिवरे, भरतभाई शहा, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी , अनिलदादा देशमुख, विवेक देशमुख,अविनाश सोनार,सतीश मुंडके,अविनाश कोतवाल,योगेश पाने,ताहा बुकवाला,विजय शुक्ल,सुनील वाघ मधुकरराव सोनार, विवेक भांडारकर, किशोरशेठ ललवानी, संजय कासार, श्रीकृष्ण भांडारकर, अली हुसेन बोहरी, सुरेश गुरव, प्रकाश भामरे, विनोद जैन, सुहास राणे, दीपक तिवारी रणजीतभाई शहा आदींनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
               श्री राजेंद्र सुतार यांच्या निवडीचे माजी खासदार प्रिया दत्त, माजी खासदार मिलिंद देवरा आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
---------------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines