जिल्ह्यातील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागा- जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील

Friday, December 4, 2020

/ by Amalner Headlines
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
                - जाहीरात -
---------------------------------------------------------------------------
अमळनेर -
जळगाव जिल्ह्यातील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमळनेर तालुका बैठकीत केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी युवक प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मंगला भोसले, सुवर्णा पाटील, कल्पिता पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, जि.प.सदस्या जयश्री पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस रंजना देशमुख, मीनाक्षी चव्हाण, रिटा बाविस्कर, आशा चावरीया, अलका पवार, दहिवदच्या सरपंच सुषमा देसले आदी उपस्थित होते.
            यावेळी अरविंद मानकरी, योजना पाटील, कल्पना पाटील, रंजना देशमुख, तिलोत्तमा पाटील, मनीष जैन, विलास पाटील आदींनी खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम सप्ताहभर राबविण्यात येणार आहेत त्यानिमित्ताने चर्चा व मार्गदर्शन केले.
                   दि. १२ तारखेला रणनीती कशी असेल याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दूरध्वनीवरून कार्यक्रम कसा साजरा करावा, पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त समारंभ व्हिडीओ कॉन्फरन्सने व लिंकद्वारे पाहता येईल. याबाबत बैठकीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
आमदार अनिल पाटील यांनी १२ तारखेला पक्षाचे झेंडे लावून तरुणाई फोटो काढून शेअर करतील व तालुक्यात ५० ते६०  हजार कॅलेंडर वितरण करण्यात येतील. अमळनेर तालुका पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम राबविण्यात एक नंबर कसा राहील याबाबत हमी दिली व विविध कार्यक्रम राबविण्यात येतील याची ग्वाही दिली. तसेच लॉकडाऊन नंतर आता जनसंपर्क साधण्यासाठी ही नामी संधी असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले

रविंद्र पाटील - वर्ष झाले काल निवडणुका झाल्या त्यातील यश शेतकरी आणि सर्व घटकांचे काम केल्याची पावती आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाची सेवा केली. वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करा व अमळनेर तालुका आदर्श कसा होईल याबाबत प्रयत्न करा. ग्रामपंचायत निवडणुका आल्या असून या निमित्ताने घरोघरी पोहचा व संपर्क करा.
        यावेळी कोव्हीड रणरागिणी अरुणा बाऱ्हे तर कोव्हीड योध्ये म्हणून रवींद्र मराठे, हरीश चौधरी, सुभाष सोनवणे, प्रसाद पाटील आदींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश विक्रम पाटील, शहर युवक अध्यक्ष बाळू पाटील, शिवाजी पाटील, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, बाजार समिती संचालक, शेतकी संघ सदस्य, युवक, महिला तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines