========================================
अमळनेर - देशाचा पोशिंदा रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असतांना या बळीराजाच्या समर्थनार्थ अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत. दि.८ डिसेंबर रोजी होणारे भारत बंद आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन या संघटनांनी जनतेला केले आहे. येथील राष्ट्रीय किसान मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा,छत्रपती क्रांती सेनेसह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात उद्या होत असलेल्या भारत बंदला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अमळनेर शहर बंद करण्याच्या जाहीर आवाहनासाठी रस्त्यावर उतरणार आहे.
राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, राज्याध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, जिल्हाध्यक्ष विश्वास पाटील,बहुजन क्रांती मोर्चा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे ,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष रमेश पाटिल, जि.उपाध्यक्ष अरुण देशमुख, हिरालाल पाटील, सामाजिक विचारवंत वक्ते प्रा.लिलाधर पाटील,छत्रपती क्रांती सेनेचे दयाराम पाटिल,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अध्यक्ष नाविद शेख,भारत मुक्ती मोर्चा,भारतीय विद्यार्थी मोर्चा गणेश बिऱ्हाडे,भारतीय बेरोजगार मोर्चा मनोज मोरे,लहुजी क्रांती सेनेचे सुरेश कांबळे आदिंनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या आंदोलनात जनतेने मोठ्या संख्येने समर्थनासाठी बंदला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे.
No comments
Post a Comment