खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्यूअल रॅली उत्साहात संपन्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद अमळनेरातील कार्यक्रमात गणेश भामरे यांच्या प्रयत्नातून यशस्वी प्रक्षेपण

Saturday, December 12, 2020

/ by Amalner Headlines

अमळनेर -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने डिजिटल व्हर्च्यूअल रॅलीचे आयोजन अमळनेर येथे आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात जी.एस. हायस्कुलमधील आयएमए हॉल येथे करण्यात आले होते. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी कार्यक्रमास सुरवात झाली. त्या नंतर संपुर्ण कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, ग्रंथालय पदाधिकारी रिता बाविस्कर, अनिल शिसोदे आदींनी शरद पवार यांच्या विषयी मत व्यक्त केले.
        त्यानंतर लाइव्ह कार्यक्रमात नागपूर येथून गृहमंत्री अनिल देशमुख,एकनाथराव खडसे
(जळगाव), छगन भुजबळ(नाशिक), धनंजय मुंडे(बीड), हसन मुश्रीफ(कागल) येथून आदींनी ऑनलाइन द्वारे व्हर्च्यूअल सभेस संबोधीत केले.त्यानंतर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील कार्यक्रमात बेरोजगार मेळावा शुभारंभ व पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शरद पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रम ठिकाणी अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल पटेल, नवाब मलिक आदींनी पवार साहेबांच्या आठवणी सांगितल्या.
मतदारसंघात ८० हजार दिनदर्शिकांचे होणार वाटप
         व्हर्चुअल रॅलीचा कार्यक्रम संपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमीत्त आमदार अनिल भाईदास पाटील यांनी ८०,००० दिनदर्शिका आपल्या मतदारसंघात वाटप करण्याचे नियोजन केले असून त्याचे प्रकाशन काल मुंबई येथे शरदचंद्र पवार यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले होते. त्या नंतर आज अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला.        प्रारंभी कार्यक्रमाची रूपरेषा तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी मांडली. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल शिसोदे यांनी केले.
यांची होती उपस्थिती
               कार्यक्रमास प्रा.अशोक पवार,प्रा.सुरेश पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, प्रदेश प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, कृ.उ.बा.संचालक विजय पाटील, महिला अध्यक्षा योजना पाटील,आशा चावरीया, रंजना देशमुख, अलका पवार,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील,नगरसेवक यज्ञेश्वर पाटील, मेजर आण्णा, बाळु पाटील, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष निलेश देशमुख, हिंमत पाटील, सुनिल शिंपी, गौरव पाटील, सचिन बेहरे, प्रदीप पाटील, महेश पाटील, हिम्मत पाटील, श्रीनाथ पाटील दर्पण वाघ, पप्पू कलोसे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
व्हर्चुअल रॅली चे यशस्वी आयोजन - गणेश भामरे यांचा सन्मान
शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे अमळनेर येथे थेट प्रक्षेपनाचा कार्यक्रम येथिल केशवा आय.टी.व्हिजनचे संचालक गणेश भामरे यांनी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचे कौतुक व आभार व्यक्त करून विशेष सत्कार करण्यात आला.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines