अमळनेर - तालुक्यातील ग्रामस्तरावर घरकुलाचा नाविन्यपूर्ण सुसज्ज प्रकल्प राबवून गुणात्मकदृष्ट्या उत्कृष्ठ घरकुल असावे याकडे वाटचाल करा असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले.
आज दि.९ डिसेंबर रोजी जी.एस. हायस्कुलमधील आयएमए हॉल येथे महाआवास अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शाम अहिरे, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील आदींसह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व सरपंच यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करतांना गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी २० नोव्हेंबर ते २८
फेब्रुवारी पर्यंत ८ लाख घरे ग्रामीण भागात बांधण्याचे उद्दिष्ट आहे. राज्य केंद्र शासनाचे योजनेतून ही घरकुले बांधण्यात येणार आहेत. अमळनेर तालुक्यात 'ब' यादी सुरुवात होणार असून १०० टक्के लाभार्थी मंजुरी केली जाणार आहे. लाभार्थीकडे जागा नसेल तर पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेतून शासन यात जागा खरेदी करून उपलब्ध करणार आहे.
उत्कृष्ट घरकुलांना बक्षीस
घरकुल योजनेत घरकुलाचे उत्कृष्ठ बांधकाम करणा-या लाभार्थ्यांना ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा स्तरावर बक्षिसे देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर सन्मान करण्यात येणार आहे.

अमळनेर तालुक्यातील शासकीय इमारतींना क्रीम आणि मरून कलर लावण्यात येत आहेत. अशी योजना राबविणारा अमळनेर हा महाराष्ट्रात पहिला तालुका असल्याचे गटविकास अधिकारी वायाळ यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती शाम अहिरे यांनी जे ग्रामसेवक लाभार्थ्यांना जास्त मदत करतील त्या गावात जास्त घरकुले होतील घरकुलांबाबत १ लाख ३५ हजार रुपये प्राप्त होणार असुन गावातील राष्ट्रीयकृत दत्तक बँकेकडून ७० हजार रुपये कर्ज सर्व्हे करतांना एकत्र करा कुणाचीही तक्रार राहणार नाही. जेवढी चांगले घरे बांधण्यास सांगाल तितकी घरे चांगली येतील व घरकुले सुंदर दिसतील.
पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील यांनी तालुक्यात ही योजना एक नंबर वर राबवू आणि एक नंबरवर येऊ याबाबत खात्री दिली. तरवाडे सरपंच रामकृष्ण पाटील यांनी वाळू मिळत नाही, हप्ते पडत नाही, घरकुलाबाबत वाळूचा प्रश्न सोडवा अशी मागणी केली. घरकुलाबाबत नाविन्य गुणात्मक घरकुल असे असावे याबाबत वाटचाल सुरू आहे अडचणी मोठ्या प्रमाणावर येतात घरकुल पूर्ण व्हावे याबाबत सरपंचांचा हेतू असतो.
आमदार पाटील यावेळी म्हणाले की घरकुले नाविन्यपूर्ण, गुणात्मक आणि सुसज्ज असा गावोगावी प्रकल्प राबवा असे आवाहन केले. यात मला देखील बक्षीस वितरण सोहळा पहायला संधी मिळेल. या योजनेत दीड लाखांपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात लाभ मिळेल. पहिला टप्पा झाल्यावर पडताळणी करावी. ग्रामसेवक सरपंचांच्या नावे घरकुल नसल्याबाबत विनाकारण बोटे मोडली जातात. मात्र तांत्रिक अडचणींमुळे दिरंगाई केल्याबद्दल तक्रारी येतात. येथील गटविकास अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांना वेगळा लौकिक प्राप्त झाला आहे. सदस्य म्हणून चांगले पदाधिकारी देखील लाभले आहेत. 'ब' यादीतून 'ड' यादीमध्ये जाण्यासाठी भरपूर चांगले प्रयत्न करा असे देखील आ.पाटील यावेळी म्हणाले.
No comments
Post a Comment