अमळनेर - तालुक्यातील मारवड येथील श्री काळभैरव मंदिर येथे भैरवअष्टमी निमित्त अनेक भाविकांनी भेट देत दर्शन घेतले.
दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात. सालाबादप्रमाणे यंदाही सर्व विधिवत पूजा व कार्यक्रम पार पडले. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम भाविकांच्या संख्येवर झाला.
मंदिर संस्थानाच्या वतीने महाप्रसाद म्हणून शिऱ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुक्याचे आमदार अनिल पाटील, जि.प.सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांनी श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेत संध्याआरती केली.
मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भेट देत दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी डॉ.विलास पाटील, उपसरपंच बी.डी.पाटील, नरेंद्र पाटील, उपसरपंच प्रविण पाटील (गोवर्धन), मधुकर कौतिक पाटील, के. व्ही. पाटील, सुनिल मुंदडा, मंदिर संस्थानचे विश्वस्त एन.एस.पाटील, आर.जे.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
No comments
Post a Comment