अमळनेरात सुरू होत असलेल्या नवीन कोविड सेंटरसाठी रोटरी क्लबने दिली देणगी ऑक्सीजन पाईपलाईन व इतर कामासाठी धनादेश उपविभागीय अधिका-यांना केला सुपूर्द

Thursday, March 25, 2021

/ by Amalner Headlines
-------------------------------------------------------------------------
                   - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------------
अमळनेर - शहरात  कोरोना रूग्णांचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून इंदिरा गांधी भवन येथे सुरू करण्यात येणा-या नविन कोविड सेन्टरला ऑक्सिजन पाईपलाईन व इतर  साहित्य,ऑक्सिजन लेव्हल मिटर व टेम्परेचर मिटर पुरवण्यासाठी अमळनेर येथील रोटरी क्लबतर्फे ९० हजाराचा धनादेश उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांचेकडे आज देण्यात आला. शहरातील नविन कोविड सेंटरला आँक्सीजन पाईप लाईन व ईतर साहित्य लोकवर्गणीतून द्यावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते.  त्या आवाहनानुसार रोटरी क्लबने पूढाकार घेतला. रोटरी अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर व प्रशांत निकम यांनी ऑक्सिजन पाईपलाईनसाठी लागणारी अधिकची रक्कम तसेच सेन्टर साठी लागणारे साहित्याचे १० किट (ऑक्सिजन मिटर व टेम्परेचर मिटर) पुरवण्यास पुढाकार घेतला. यासाठी अमळनेर रोटरी क्लबच्या सर्व सभासदांनी परवानगी देवून अशा महामारीच्या काळात सदैव सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ह्या रक्कमेपैकी ५५ हजार रूपये रोटरी क्लब अमळनेर व ५० हजार रुपये रो.प्रशांत निकम यांनी दिली.
कोरोना महामारी काळाच्या सुरवातीला एक वर्षा पुर्वी ग्रामीण रुग्णालय येथे रूपये २ लाख खर्च करून ऑक्सिजन पाईपलाईन, ५० पिपीई किट, एक स्वॅब टेस्टिंग केबिन, मास्क वाटप असे कार्य करण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला होता.
             आज दि.२५ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी सिमा आहीरे यांना यासाठीच्या रू. ९० हजार रक्कमेचा चेक सुपूर्द केला व ऊर्वरीत वस्तू स्वरूपात पोच करणार असल्याचे सुचविले. या प्रसंगी रोटरी अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर ,रो.प्रशांत निकम,रो.महेश पाटील (सेक्रेटरी) रो. डाॅ. शरद बाविस्कर. - डायरेक्टर मेडीकल रो. डाॅ. प्रितम जैन.- डायरेक्टर उपस्थीत होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines