सिंधी कॉलनीतील कोविड रॅपिड चेकींगमध्ये ४७ पॉझिटीव्ह ४ जण कॉलनीतील तर ४३ बाहेरील रूग्ण

Sunday, March 21, 2021

/ by Amalner Headlines
-----------------------------------------------------------------
                  - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------
अमळनेर - आज आरोग्य विभागाच्या वतीने सिंधी कॉलनीतील निरंकारी भवन येथे नागरिकांसाठी कोविड रॅपिड अॅटीजेन चाचणी घेण्यात आली. यात एकूण २९५ पैकी ४७ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले.
                   अमळनेर शहर व तालुक्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पहाता प्रशासनाच्या वतीने नागरी वस्तीत कोविड चाचणी करण्यात येत आहे.
आज येथील सिंधी कॉलनीतील निरंकारी भवन येथे कॉलनी व बाहेरील असे एकूण २९५ नागरिकांची कोविड चाचणी घेण्यात आली. त्यात कॉलनीतील ४ तर बाहेरील ४३ असे एकूण ४७ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले.ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.प्रकाश ताळे, नपा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.राजेंद्र शेलकर व सहका-यांनी तपासणी केली. अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गोसावी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.या शिबिरात नपाचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड प्रशासन अधिकारी संजय चौधरी,डॉ.आशिष पाटील,राकेश बागुल,हरिष चौधरी,मनोज निकुंभ,राजू शेख,दिनेश पाटील,योगेश पाटील,गणेश शिंगारे यांनी सहभाग घेतला. तर शिबीराच्या आयोजनासाठी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गुरूनामल बठेजा,महेश पाटील,रोहित बठेजा यांनी सहकार्य केले.
--------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines