कोरोनाची शहरात दर दिवशी शतकी हजेरी
---------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
------------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अमळनेर शहरात प्रशासनाने ३ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. आज पहिल्या दिवशी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता शहरातील इतर सर्व दुकाने बंद होती.आज रविवार व लॉकडाऊनचा दुसरा दिवस असल्याने अधिक कडकडीत बंद पाळला जाऊ शकतो.त्यादृष्टीने नियमांचे उल्लंघन करणा-यांवर प्रशासनाने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने नागरी वस्तीत जाऊन तपासणी सुरू केली आहे. दर दिवशी १०० पेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत.
पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद
शहरात लॉकडाऊन असला तरी काही मंडळी काही ना काही निमित्ताने फिरतांना आढळून आली. शासकीय कार्यालये,बॅंका सुरू असल्याने त्याठिकाणी आपल्या कामासाठी नागरिकांची वर्दळ दिसून आली. खाद्यपदार्थ घरपोच पार्सल पुरवठा करणा-या हॉटेल सुरू होत्या. अन्य बाजारपेठ पूर्ण बंद होती. नागरिक व व्यापारी बांधवांचा लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. 

कठोर कारवाईची गरज
आज रविवार असल्याने सर्व कार्यालये सुटीमुळे बंद असतील त्यामुळे आज लॉकडाऊन कमालीचा यशस्वी ठरू शकतो. प्रशासनाने कठोर कारवाई करून विनाकारण फिरणारे,चौकात गप्पा करणारे, दुचाकी वाहनावर ट्रीपल सीट घेऊन फिरणारे यांना आळा घालण्याची अपेक्षा काही जबाबदार नागरिकांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन म्हणजे केवळ दुकाने व बाजारपेठ बंद व लोक फिरायला मोकळे असा काहींचा गैरसमज झाला आहे की काय अशी परिस्थिती गावात दिसून आली. याबाबत पोलीस व प्रशासनाने कठोर भुमिका घेऊन दंडात्मक कारवाई करावी अशी अपेक्षाही जनतेतून व्यक्त होत आहे.
No comments
Post a Comment