------------------------------------------------------------------
अमळनेर - येथील बस स्टॅंडमध्ये राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली शिवभोजन थाळी योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दररोज ७५ गरजूंना या योजनेचा लाभ दिला जात आहे. राज्य शासनाने प्रत्येक शहरात गरीब व गरजूंसाठी अल्पदरात भोजन देण्यासाठी शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे.
येथील बस स्टॅंड मधील साई रेस्टॉरंटमध्ये ही योजना याआधीच सुरू झाली होती. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही दिवस हे केंद्र बंद होते.पण आता दररोज हे केंद्र सुरू रहाणार आहे. दररोज दुपारी ७५ व्यक्ती या केंद्राचा लाभ घेत असतात. वरण - भात,भाजी व दोन चपात्या असा मेनू गरजूंना फक्त ५ रुपये दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे केंद्राचे संचालक श्री संदीप पाटील यांनी सांगितले.

No comments
Post a Comment