उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण,सर्वसामान्यांना कुलर्स देतोय दिलासा माफक दर व चांगल्या प्रतीच्या कुलर्ससाठी 'संगम कुलर्स ' ठरतेय ग्राहकांची पहिली पसंती

Thursday, April 29, 2021

/ by Amalner Headlines
📞फोनवरून मागणी केल्यास कुलर्स व स्पेअर पार्टस् देण्याची सुविधा
------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
------------------------------------------------------------
अमळनेर - एप्रिल हिटने खान्देशातील वातावरण तापू लागले आहे. उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले असून सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने नागरिक आपल्या घरातच आहेत. या उन्हापासून सुटका व्हावी व थंड हवा मिळावी म्हणून नागरिकांची कुलर्सला पसंती मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळातही शहरातील संगम कुलर्सच्या वतीने माफक दरात ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
वातावरणाने ओलांडली चाळीशी
मार्च महिन्यानंतर उन्हाच्या वाढत्या झळा वातावरण तापवायला सुरूवात करीत असतात. दिवसेंदिवस उन्हाचा पारा अधिकच वेगाने वाढत आहे. आता तर एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाच्या तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. सकाळी साडेनऊ - दहा वाजेपासूनच वातावरण गरम होत आहे. नागरिकांना बाहेर फिरणे अशक्य होत आहे. तर रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत हवेत उष्णता जाणवते. सध्या कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक जण आपल्या घरीच आहेत. या काळात दुपारच्या उन्हाची झळ,गरम वातावरण यापासून दिलासा मिळावा यासाठी सर्वसामान्य नागरिक एसी ऐवजी कुलर्सचा वापर करीत आहेत.
कुलर्सची परवडणारी रेंज
आजच्या काळात एसी वापरणे प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. अशावेळी सर्वसामान्य लोकांना कुलर्स हा चांगला पर्याय ठरला आहे. अमळनेर शहरातील सुभाष चौकात असलेल्या संगम कुलर्स येथे विविध आकारातील व सामान्य माणसाला खिशाला परवडतील अशा कुलर्सची चांगली रेंज विक्रीसाठी उपलब्ध आहे. दोन फुटापासून ते पाच फुट आकाराचे चांगल्या प्रतीचे,टिकाऊ,सहज हलवता येणारे,आकर्षक रंग असलेले डेझर्ट कुलर्स ग्राहकांच्या पसंतीस येत आहे. हवाहवाई,तुफानी,स्टील,फायबर असे वेगवेगळे प्रकारचे रंगीबेरंगी कुलर ग्राहकांना आकर्षित करत आहेत. सुमारे १५०० रूपये ते ८००० रूपये अशा कमी किंमतीत मिळणारे कुलर्स गरीब,गरजू व सर्वसामान्य लोकांची गरज भागवत आहेत.
'संगम'ची विश्वासार्हता
गेल्या अनेक वर्षापासून इलेक्ट्रीकल्स वस्तू,शेती पंप,पाणी मोटारी,कुलर्स विक्री व दुरूस्ती व्यवसायात असल्याने संगम कुलर्सची ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली आहे. ग्राहकांना योग्य सल्ला,मागणीप्रमाणे पुरवठा,विक्रीचे माफक दर, वेळेत सेवा पुरवणे,नफ्यापेक्षा ग्राहक हितास अधिक प्राधान्य यामुळे बठेजा परिवाराची फर्म 'संगम कुलर्स ' ला ग्राहक पसंती देत आहेत. दरवर्षाप्रमाणे यावर्षीही शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी कुलर्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करून कुलर्सची विक्री केली जात आहे. शहरातील ग्राहकांसाठी दुरूस्तीसाठी अल्पदरात घरपोच सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात निर्धारित वेळेत कुलर्स व शेतीपयोगी पंप,पाणी मोटारी विक्री व दुरूस्तीसाठी दुकान सुरू आहे. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी फोनवरून मागणी केल्यास कुलर्स व स्पेअर पार्टस् उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्राहकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन संगम कुलर्सचे प्रोप्रा गुरूनामल बठेजा व रोहित बठेजा यांनी केले आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines