अमळनेर भाजयुमोतर्फे १ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन

Thursday, April 29, 2021

/ by Amalner Headlines
----------------------------------------------------------------
                  - * जाहीरात * -
----------------------------------------------------------------
अमळनेर - देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना उपचारांसाठी बेड मिळत नाही, औषधे मिळत नाही इतकेच नाही तर ऑक्सिजनही मिळत नाही. सर्वत्र विदारक अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. तर लसीकरण करण्याआधी रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे. अमळनेर शहर व तालुका भाजयुमोतर्फे दि.१ मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अनेक आजाराच्या रूग्णांना रक्ताची आवश्यकता
               राज्यात सध्या रक्ताचा साठा कमी आहे. आपल्या रक्तदानाच्या दातृत्वाने गंभीर आजारांसाठी करण्यात येणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त, विविध आजारांचे रुग्ण, थॅलेसिमियाचे रुग्ण आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते.यापैकी थॅलेसिमिया आणि हिमोफिलियाच्या रुग्णांना नियमितपणे रक्त संक्रमण करून घ्यावं लागते. एकदा संकलित करण्यात आलेले रक्त ३५  दिवसांपर्यंत वापरता येऊ शकते, यामुळेच रक्तपेढ्यांमध्ये सध्या पुरेसा साठा करणं आवश्यक आहे. 
भाजयुमोतर्फे शिबीर
             रक्तदान करण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून अमळनेर शहर व तालुका भारतीय जनता युवा मोर्चा अमळनेरतर्फे दि.१ मे २०२१ रोजी सकाळी ९ वाजता येथील रोटरी हॉल,पीबीए इंग्लीश मिडीयम स्कूल शेजारी,
द्रौ.रा.कन्या शाळेसमोर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करावे असे आवाहन भाजयुमो तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत, शहराध्यक्ष पंकज भोई,सरचिटणीस राहुल चौधरी,समाधान पाटील, भूषण देवरे,शुभम राजपूत,जगदीश पाटील यांनी केले आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines