'ब्रेक द चेन' चे उल्लंघन करणा-यां १६६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई पोलीसांनी वसुल केला ३६,३०० रूपये दंड

--------------------------------------------------------------------
                         - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------
अमळनेर - राज्य शासनाने लागू केलेल्या 'ब्रेक द चेन' या नियमांतर्गत काही निर्देश जारी केले आहेत. सर्व नागरिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर पोलीस प्रशासनाने आज दंडात्मक कारवाई केली आहे.
             अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक १९ मे २०२१ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता.त्यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
                  त्यात ८७ व्यक्तींची ॲन्टीजेन टेस्ट केली असता ०३ व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आल्या आहेत,तर पोलीस व नगर पालिका यांच्या संयुक्तपणे केलेल्या कारवाईत विना मास्क फिरणारे ६० व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे तर ०१ व्यक्तींवर ५०० रुपये दंड आणि एका दुकानावर ५००० व एका दुकानाने सिल तोडले म्हणून १००० असा एकूण १८,५००/- रुपये दंड, M act ई चलन प्रमाणे १२ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे एकूण २४००/-रूपये दंड करण्यात आला,विना हेल्मेट फिरणारे ॲानलाईन पद्धतीने २९ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.गलवाडे रोड नाकाबंदी येथे विना कारण फिरणारे १० व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, ०९ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे असा एकूण ६८००/- रूपये दंड करण्यात आला आहे.
तर कलागुरू मंगल कार्यालय नाकाबंदी येथे विना कारण फिरणारे ४३ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे ८६००/- दंड करण्यात आला आहे. असे एकूण १६६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून ३६,३००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
     पोलीसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांवर वचक निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.