मिशन 'ब्रेक द चेन' शासकीय नियमांचे उल्लंघन करणा-यांवर पोलीसांनी केली कारवाई आज १३५ व्यक्तींकडून ३५,५०० रुपये दंडाची वसुली

Thursday, May 20, 2021

/ by Amalner Headlines

---------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
-------------------------------------------------------------
अमळनेर -
राज्यात वाढत्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने दि. १ जून पर्यंत नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरू असतील तर दुकानदारांवर व विनाकारण गावात फिरणारे यांच्यावर नपा व पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे. आज पोलीसांनी एकूण १३५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली. शहरातील इतर नागरी भागात विनाकारण फिरणारे आढळून येत असल्याने बाजारपेठ व मुख्य रस्त्याप्रमाणे इतर भागातही लक्ष देण्याची गरज आहे. 
मास्क व हेल्मेट नाही मग दंड अटळ
         अमळनेर पोलीसांनी आज दिनांक २० मे २०२१ रोजी विविध ठिकाणी कारवाईसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त लावला होता.त्यात प्रामुख्याने १०० व्यक्तींची ॲन्टीजेन टेस्ट  केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आला नाही, तर पोलीस व नगरपालिका यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत विना मास्क फिरणा-या ६० व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे आणि ८ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे असा एकूण १६,०००/- रुपये दंड वसुल करण्यात आला,M act ई चलन प्रमाणे ९ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, ३ व्यक्तीवर २०० रुपये प्रमाणे आणि १ व्यक्तीवर १००० रुपये प्रमाणे असा एकूण ६१००/- दंड वसुल करण्यात आला,विना हेल्मेट फिरणा-यांवर ॲानलाईन पद्धतीने २१ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
मुख्य मार्गावर नाकेबंदी
    शहरातील पैलाड चौक येथील नाकाबंदीत विना कारण फिरणारे ३३ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे, ६ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, १ व्यक्तीवर १००० रुपये प्रमाणे असा एकूण १०,६००/- रूपये दंड वसुल करण्यात आला आहे.
कलागुरू मंगल कार्यालय येथील नाकाबंदीत विना कारण फिरणारे १४ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे २८००/- रूपये दंड करण्यात आला. असा आज रोजी १३५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून एकूण ३५,५००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
इतर वस्तीतही लक्ष देण्याची गरज
     अमळनेर शहरात पोलीस विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कार्यवाहीचे सुजान नागरिकांनी कौतुक केले आहे. कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी शासनाने व डॉक्टरांनी दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. पण काही नागरिक विनाकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस शहरातील मुख्य रस्ता व बाजारपेठेत नाकेबंदी करून कारवाई करत आहेत. त्याचप्रमाणे नागरी वस्तीत लक्ष देण्याची गरज असल्याचे जनतेत बोलले जात आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines