अंचलवाडी येथील आदिवासी कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्या आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री दाभाडे यांची मागणी

Wednesday, May 19, 2021

/ by Amalner Headlines
अंचलवाडी येथे जाऊन आदिवासी पावरा कुटुंबाची घेतली भेट
---------------------------------------------------------------------
                    - * जाहीरात * -
----------------------------------------------------------------------
अमळनेर -
तालुक्यातील अंचलवाडी येथे दि.१६ मे रोजी आलेल्या चक्रीवादळात चिंचेचे झाड पडून हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी बल्लू पावराच्या दोन अल्पवयीन मुली जागेवरच मृत झाल्याची घटना घडली. लवकरात लवकर या पिडीत कुटुंबाला प्रशासनाने आर्थिक मदत प्राप्त करून दयावी असे निवेदन आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. जयश्री दाभाडे यांनी नायब तहसीलदार श्री पवार यांना दिले.
तालुक्यात दि.१६ मे २०२१ रोजी चक्री वादळाचा फटका बसला आहे. याच वादळात तालुक्यातील अंचलवाडी येथील राजेंद्र पाटील यांच्या शेतात हात मजुरी करणारे आदिवासी पावरा बल्लू बारेलाचे कुटुंब राहत होते. अचानक आलेल्या वादळात झोपडी शेजारी असलेले चिंचेचे खूप जुने झाड झोपडीवर कोसळले आणि यात या कुटुंबातील मोठी मुलगी ज्योती बारेला (वय१६) व रोशनी बारेला (वय १०) ह्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.याबाबतीत सर्व शासकीय कागदपत्रांची लवकरात लवकर पूर्तता करून या कुटुंबास ताबडतोब शासकीय योजनांचा लाभ देत आर्थिक मदत प्राप्त करून द्यावी असे निवेदन देण्यात आले.यावेळी अय्याज बागवान,राहुल बडगुजर,मनोज पारधी,पुनमचंद पारधी,उमाकांत ठाकूर,मंगेश महाजन,अनिल पारधी,विजय साळुंके आदी उपस्थित होते.
घटनास्थळी भेट - परिवाराचे सांत्वन
प्रा.जयश्री दाभाडे यांनी पीडित कुटुंबाची अंचलवाडी येथे जाऊन दि.१७ रोजी भेट घेतली. यावेळी पोलीस पाटील,मालक राजेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करून कुटूंबाला लवकरात लवकर अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines