----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------
अमळनेर - येत्या दि.१४ मे रोजी अक्षयतृतीया व रमजान ईद हे सण असल्यामुळे नागरिकांना गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी दि.११ मे पासून १४ मे पर्यंत व्यावसायिकांना आपली दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी अमळनेर नगर परिषदेच्या अध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातलॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने निर्धारित वेळेत उघडण्यात येत आहेत. पण दि.१४ मे रोजी अक्षय तृतीया,श्राद्ध व रमजान ईद हे सण असल्यामुळे नागरिकांना आवश्यक व पूजेच्या वस्तूंची खरेदी करायची आहे. कपडे,पूजा साहित्याची दुकाने बंद असल्याने या वस्तूंची खरेदी करणे शक्य होणार नाही. यासाठी दि.११ ते १४ मे या कालावधीत आवश्यक ती सर्व दुकाने नियमाप्रमाणे सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी अमळनेर नगर परिषदेच्या अध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
No comments
Post a Comment