अमळनेर - तालुक्यातील जैतपीर येथे आखाजी निमित्त जुगार खेळणा -या आरोपींना मारवड पोलीसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.
जैतपीर येथे काही जण अवैधपणे जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली जैतपीर येथे छापा टाकुन भुषण चंद्रसिंग पाटील,संतोष हिरामण कोळी,
गणेश दशरथ कोळी, विक्की संतोष कोळी,समाधान दयाराम कोळी सर्व रा.जैतपीर यांना रू.२०३२०/- रोख रक्कम व ५२ पत्त्यासह तीन पत्ती जुगार खेळतांना पकडले व गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर, पोलीस हवालदार फिरोज बागवान,संजय पाटील, पोलीस नाईक सुनिल तेली, सुनिल अगोणे व होमगार्ड सागर नेरकर हे करीत आहेत.
No comments
Post a Comment