----------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील निंभोरा शिवारातील सात्री येथे पुनर्वसन बांधकाम सुरू आहे. या ठीकाणी असलेल्या साहित्यापैकी रू.२४,५००/- किंमतीची पाण्याची लोखंडी टाकी चोरतांना आरोपी खुशाल पारधी व संदिप पारधी (दोघे रा.निंभोरा ता. अंमळनेर) हे आढळून आले असुन फिर्यादी दिनेश शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार फिरोज बागवान, पो.ना. सुनिल तेली,सुनिल आगोणे, मुकेश साळुंखे, असे करत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment