--------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन लागू केला असून नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरू असतील तर दुकानदारांवर व विनाकारण गावात फिरणारे यांच्यावर नपा व पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे. आज पोलीसांनी एकूण ८५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. मास्क व हेल्मेट नाही मग दंड अटळ
अमळनेर पोलीसांनी आज दिनांक २१ मे २०२१ रोजी विविध ठिकाणी कारवाईसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त लावला होता.त्यात प्रामुख्याने १०८ व्यक्तींची ॲन्टीजेन टेस्ट केली असता ०८ व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आल्या आहेत. तर पोलीस व नगरपालिका यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत विना मास्क फिरणा-या ०४ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे आणि ०५ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे असा एकूण २३००/- रुपये दंड वसुल करण्यात आला,M act ई चलन प्रमाणे ९ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, १३ व्यक्तीवर २०० रुपये प्रमाणे आणि १ व्यक्तीवर १२०० रुपये प्रमाणे असा एकूण ९०००/- रूपये दंड वसुल करण्यात आला,विना हेल्मेट फिरणा-यांवर ॲानलाईन पद्धतीने ७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
मुख्य मार्गावर नाकेबंदी
शहरातील गलवाडे रोड येथील नाकाबंदीत विना कारण फिरणारे २७ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे, ३ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, असा एकूण ६९००/- रूपये दंड वसुल करण्यात आला आहे.
कलागुरू मंगल कार्यालय येथील नाकाबंदीत विना कारण फिरणारे २१ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे ४२००/- रूपये दंड करण्यात आला. असा आज रोजी ८५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून एकूण २१,४००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment