तांदळी येथे महसुल विभागाची दमदार कारवाई अवैध वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले

--------------------------------------------------------------------
                              - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------
अमळनेर -
तालुक्यातील पांझरा नदी काठावरील तांदळी या गावात अवैध पध्दतीने वाळू उपसा व वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर नदी पात्रात पकडण्यात आले आहेत.
        अमळनेरचे तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २६ मे २०२१ रोजी मौजे तांदळी येथे पांझरा नदीपात्रात अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारी तीन ट्रॅक्टर महसुल विभागाने ताब्यात घेतले आहेत. तलाठी गौरव शिरसाठ, मनोहर भावसार,विकास परदेशी, पराग पाटील, प्रकाश महाजन, तलाठी  भदाणे, निलेश पवार व सचिन बमनाथ यांच्या पथकाने  कार्यवाही केली असून मारवड पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर जमा करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.