५५ पुरस्कारांच्या मानकरी प्रा. जयश्री दाभाडे यांनी सामाजिक बांधीलकी जपत साजरा केला वाढदिवस वृक्षारोपण,अन्नदान या उपक्रमांचे आयोजन

Friday, May 7, 2021

/ by Amalner Headlines
----------------------------------------------------------------------
                       - * जाहीरात * -
-------------------------------------------------------
अमळनेर -
  ज्ञानदानाच्या कार्यासोबत सामाजिक कार्य करीत पत्रकारितेतून जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या,लोकांच्या वेदनेवर फुंकर घालून त्यांना मायेची ऊब देणाऱ्या प्रा.जयश्री दाभाडे यांनी आपला वाढदिवस पर्यावरण संवर्धन,गोरगरिबांच्या प्रति दातृत्वाची भावना जपत मुस्लिम बांधवांना रोजाच्या काळात प्रेमाचा गारवा देत जातीय सलोखा राखून साजरा करीत समाजापुढे आदर्श घालून दिला आहे.

अंबाऋषी टेकडीवर वृक्षारोपण
        अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या,पत्रकार,वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.जयश्री दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी ७ वाजता अंबाऋषी टेकडी येथे १० रोपांची लागवड करण्यात आली.यात वड,पिंपळ,चिंच,निम इ. पर्यावरण संवर्धक वृक्षांचा समावेश आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनात भर पडली. त्याच प्रमाणे अंबाऋषी टेकडी ग्रुप हा गेल्या काही वर्षांपासून टेकडी वरील नैसर्गिक स्रोताचा उपयोग करून वृक्षसंवर्धनाचे कार्य करत आहे. त्यांच्या ह्या कार्याला सहकार्य म्हणून तसेच काम करत असताना लागणारे आवश्यक साहित्य १०पावडी,१० तगाऱ्या भेट स्वरूपात दिल्या.यावेळी संपूर्ण टेकडी ग्रुपने श्रमदान करून सर्वांनी मिळून वृक्षारोपण केले.
गरजूंना अन्नदान

        सध्या कोरोनाच्या आपत्ती काळात अनेक हातमजुरी करणारे हात थांबले आहेत.गेल्या संपूर्ण वर्षभरात कोरोनाच्या हाहाकारा मुळे सामान्य गरीब जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यांच्या पोटाला चिमटे बसत आहेत अशा वेळी  हात मजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबांची क्षुधाशांती व्हावी म्हणून त्यांना अन्नधान्य व डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी १० किलो तांदूळ,गहू व साबण असे किट वाटप करण्यात आले. यासह जातीय सलोखा टिकून रहावा,मुस्लिम धर्माच्या सणाचा आदर करत त्यांनी पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू असून रमजानचा शेवटचा टप्पा आहे.यात लॉकडाऊनमुळे रोजे सोडतांना बऱ्याच गोष्टी उपलब्ध होऊ शकत नाही. तसेच रोजगार बंद झाल्याने गरजू मुस्लिम बंधू भगिनींना वेळेवर काही गोष्टी उपलब्ध होऊ शकत नाही. या अनुषंगाने इनाम नगर गलवाडे रोड येथील मुस्लिम बंधू भगिनींना टरबूज वाटप करण्यात आले. रोजे ठेवत असतांना शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. तसेच कडक उन्हाळा असल्याने देखील त्रास होतो.टरबूज हे आरोग्यासाठी आणि उन्हात उत्तम फळ आहे.शरीरातील पाण्याची कमतरता वेगाने भरून काढते.शिवाय टरबूज हे थंड असते ह्या दृष्टिकोनातून टरबूज वाटप करण्यात आले.
          प्रा.दाभाडे ह्या आपल्या व आपल्या कटुंबियांचा जन्मदिवस गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवूनच साजरा करतात.आपल्या कन्येच्या विवाहात देखील त्यांनी ही सामाजिक बांधीलकी जपत अपंग व विशेष मुलांना विवाहात आमंत्रित करून सत्कार केला होता.असेच अनेक समाजाभिमुख उपक्रम प्रा. दाभाडे ह्या सातत्याने राबवित असतात. त्यामुळे त्यांची एक आदर्श छबी समाजात असून अश्या वैविध्यपूर्ण उपक्रमांना लक्षात घेऊन कामांची दखल घेऊन विविध संस्था,प्रशासन यांनी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यात ५५ पुरस्कारांचा समावेश असून |राष्ट्रीय,राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय पातळीवर त्यांच्या कामांची दखल घेण्यात आली आहे. प्रा दाभाडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांना काल वाढदिवशी सामाजिक,राजकिय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
यांची होती उपस्थिती
                  वरील सर्व उपक्रम शहरातील वेगवेगळ्या परिसरात घेण्यात आले. यावेळी आदिवासी एकता संघर्ष समितीच्या संस्थापक अध्यक्ष प्रा.जयश्री दाभाडे,अय्याज बागवान,राहुल बडगुजर,मनोज पारधी,संदीप भोई(खली),गणेश भोई,अनिल पारधी,विजय साळुंके,रोहित चव्हाण,महेंद्र साळुंके टेकडी ग्रुप  सर्व सदस्य उपस्थित होते.तर महेंद्र बोरसे,प्रवीण गोसावी,ज्ञानेश्वर भाऊ यांचे सहकार्य लाभले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines