-----------------------------------------------------------------
अमळनेर - कोविडच्या आपत्तीमुळे जिल्ह्यातील सर्व आमदारांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यामार्फत राज्य शासनाकडे नवीन अद्ययावत रूग्णवाहिकांची मागणी केली होती. त्या मागणीच्या पूर्ततेचा पहिला टप्पा पार पडला असून आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय अमळनेर व प्राथमिक आरोग्य केंद्र,मांडळ येथील रूग्णवाहिकांचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.शासनाकडे केली होती मागणी
अमळनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र,मांडळ येथे असणार्या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली होती. याची दखल घेऊन तत्परतेने आमदार अनिल पाटील यांनी राज्य शासनाकडे अमळनेर तालुक्यासाठी रूग्णवाहिकांची मागणी केली होती.याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात २ रूग्णवाहिका तालुक्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. तर उर्वरित रूग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.

आज झाले लोकार्पण
या रूग्णवाहिकांचे आज ग्रामीण रूग्णालयात लोकार्पण करून त्यांना शासकीय सेवेसाठी अर्पीत केल्या. यावेळी रूग्णवाहिका चालकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करून त्यांच्याकडे चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल,विनोद जाधव, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोळे,तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.गिरीश गोसावी, ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ.प्रकाश ताळे, नपाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विलास महाजन,ग्रामीण रूग्णालयाचे डाॅ.जी.एम.पाटील,डाॅ. सागर पाटील (मांडळ), नपा रूग्णालयाचे डाॅ.राजेंद्र शेलकर,हरीष चौधरी, चालक भुषण पाटील, प्रदीप पाटील, राहुल गोत्राळ, योगेश पाटील, पप्पुभैय्या कलोसे आदी उपस्थित होते.

म्हणाले आ.अनिल पाटील
कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांना वेळेत उपचार मिळणेअत्यावश्यक
असते.यात बर्याच रूग्णांना अँब्युलन्सची आवश्यकता पडत असते.आता उर्वरित अॅब्युलन्सेसही लवकरच मिळणार असून तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. तालुक्यातील रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आपण कटीबध्द आहोत असे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी म्हटले आहे.
No comments
Post a Comment