तालुका राजपूत एकता मंचतर्फे महाराणा प्रताप जयंती साजरी

-----------------------------------------------------------------
                      - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोनाआजाराच्या प्रादूर्भावामुळे अमळनेर तालुका राजपुत एकता मंचतर्फे हिंदुसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती अमळनेरात शासकीय नियम पाळून कोणतीही गर्दी न करता साधेपणाने साजरी करण्यात आली.
           धुळे रोडवरील महाराणा प्रताप चौकातील स्मारकावर मोजक्या समाजबांधवांनी एकत्र येऊन राणा प्रतापांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन केले,प्रामुख्याने माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी,माजी नगरसेवक विक्रांत पाटील आदींची विशेष उपस्थिती होती.तसेच राजपूत समाज पंच मंडळाचे अध्यक्ष रणजित भीमसिंग पाटील,चंदूसिंग परदेशी,नरेंद्रसिंग ठाकूर,अनिल भीमसिंग पाटील,अॅड.दीपेन परमार,चेतन राजपूत,राजुसिंग परदेशी,प्रकाश भीमसिंग पाटील,भरतसिंग पाटील,विलास पाटील,गुलाबसींग पाटील,जयराम पाटील,जयदीप राजपूत,सुरजसिंग परदेशी,मुकेश परदेशी,कोमल राजपूत,योगेश राजपूत,प्रणवसिंग राजपूत,तेजस ठाकूर,हर्षल ठाकूर,सावन राजपूत,कुलदीप पाटील,गोविंदा पाटील,अरुण पाटील,जयदीप पाटील यासह समाजबांधव व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
         दरम्यान शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी देखील याचपद्धतीने राणा प्रताप यांचे प्रतिमापूजन करून साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली.
भूखंड दिल्याने नगराध्यक्षांना दिले आभार पत्र
          अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने राजपूत व परदेशी समाजाला सामाजिक व सेवेच्या उद्दिष्टाने अमळनेर न.प. चा खुला भूखंड क्रमांक टी पी १७५/२/१८ (जागेचे क्षेत्र १३४९.५५चौ.मी.)हा भूखंड न.प. सभा ठराव क्रमांक ९७५ द्वारे नगराध्यक्षानी मिळवून दिल्याने नगराध्यक्ष सौ पुष्पलता साहेबराव पाटील यांचे विशेष आभार मानणारे पत्र यावेळी कृषिभूषण साहेबराव पाटील यांना देण्यात आले,तसेच त्यांनी देखील यासाठी अनमोल सहकार्य केल्याने त्यांचेही आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.