सक्तीच्या विज वसुली मोहिमेत सवलत द्या - मा. आ. शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराची मागणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

Wednesday, June 30, 2021

/ by Amalner Headlines
----------------------------------------------------------------
                   - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------
अमळनेर -
सक्तीच्या विज वसुली मोहिमेत विज वितरण कंपनीने ग्राहकांना सवलत द्यावी अशी मागणी मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराच्या वतीने आज करण्यात आली. येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना आ. श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले. 
सक्तीची वसुली अन्यायकारक
                  कोविड १९ मुळे ओढवलेल्या बिकट परिस्थितीत नागरिकांना गेल्या ४ महिन्यापासून नियमित वीज बिल देयके मिळाले नाहीत.आपल्या कार्यालयातर्फे नागरिकांना आता गेल्या ३/४महिन्याचे वीज बिल एकत्रित देण्यात आलेले आहे.
त्यामुळे सदरहू बिलाची रक्कम खुपच अधिक प्रमाणात असल्यामुळे व कोविडच्या  लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्यामुळे सदरहू बिल एक रकमी भरणे नागरिकांना शक्य होऊ शकत नाही. अश्या परिस्थितीत सक्तीची वीज बिल वसुली मोहीम राबवून नागरिकांचे वीज कनेक्शन कट करणे हे अतिशय अन्यायकारक आहे.तरी नागरिकांना वीज बिल अदा करण्यात विशेष सवलत देऊन (३/४टप्प्यात) हवालदिल झालेल्या नागरिकांना दिलासा द्यावा.अन्यथा आम्हास आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागेल अश्या आशयाचे निवेदन आज दि.३० जून रोजी आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर या पदाधिका-यांची स्वाक्षरी
                     निवेदनावर गटनेते प्रविणकुमार पाठक, प्रतोद सलिम भाई टोपी,उपगटनेते सौ. सविता संदानशिव,देविदास महाजन नगरसेवक ,अनिल गंगाराम महाजन,पंकज पंडित चौधरी,महेश राजू जाधव,धनंजय रमेश महाजन,योगराज राजेश संदानशिव,किरण देविदास बागुल,संतोष लोहेरे,हरिष देशपांडे, राघव देशपांडे,परागभाऊ चौधरी आदींच्या स्वाक्षरी आहेत.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines