अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ रहातील सुरू - त्यानंतर मात्र कडक कारवाई
--------------------------------------------------------------
अमळनेर - जिल्ह्यात कोविड १९ डेल्टा प्लस आजाराचे रुग्ण आढळून आल्याने लहान मुलांमध्ये प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यात दि.२५ जून २०२१ च्या आदेशान्वये कलम १४४ लागू केलेले आहे. तसेच दिवसा जमावबंदी व सायंकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. शनिवार व रविवार जनता कर्फ्यु
जिल्हा प्रशासनाने घोषित केल्यानुसार आठवड्याच्या अखेरीस शनिवार व रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व सर्व बाजार पेठ बंद राहिल.अत्यावश्यक सेवेमध्ये मेडीकल, दवाखाना,किराणा दुकाने,भाजीपाला,कृषी निगडीत व्यावसायिक दुकाने,दूध,पाणी जार आदी दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
नागरिकांना आवाहन
सर्व नागरिकांनी अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. पाच पेक्षा जास्त नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी एका जागी जमा होऊ नये. तसेच मास्क व सामाजिक अंतर या नियमाचे पालन करावे. मास्क तसेच सामाजिक अंतराचे पालन न केल्यास रुपये पाचशे दंड करण्यात येईल. तरी नागरिकांनी काळजी घेवून आणि नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

