दगडी दरवाजा कामात हेतूपुरस्सर दिरंगाई,१० दिवसात काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलन जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांचा इशारा

-------------------------------------------------------------------
                      - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------
अमळनेर -
  शहराची प्राचीन ओळख असलेल्या दगडी दरवाज्याचा बुरुज सुमारे दोन वर्षांपूर्वी ढासळला होता.त्याची पुन्हा दुरूस्ती व उभारणी करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांनी पुरातत्व विभाग,जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी,मुख्याधिकारी यांच्याकडे वेळो वेळी पाठपुरावा करून काम करण्यास भाग पाडले होते .परंतु  सदर कामात पुन्हा हेतुपुरस्करपणे दिरंगाई होत असल्याचा आरोप श्री चौधरी यांनी केला आहे. काम तातडीने सुरू करण्याबाबत श्री चौधरी यांनी आज दि. ४ जून रोजी नपाच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
तातडीने काम सुरू करा अन्यथा आंदोलन
             अमळनेर शहराला प्राचीन इतिहासाची सदैव साक्ष देणारा प्रेरणादायी दगडी दरवाजा सुमारे २ वर्षांपूर्वी ढासळला असून राजकीय खेळामुळे की हेतुपुरस्सरपणे दुर्लक्षामुळे सुमारे ऑगस्ट २०२० पासून कार्यारंभ आदेश देऊन देखील कामात आज पर्यंत कुठलीही विशेष प्रगती दिसत नाही.मागील काळात संबंधित ठेकेदारास फार मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले याची आम्हास जाणीव आहे. परंतु त्यावर काही तरी मार्ग काढणे आवश्यक असतांना देखील आपल्या विभागामार्फत विशेष दुर्लक्ष केले जात आहे.आपल्या शहरात नगर परिषदेतर्फे काही विकास कामे विना कार्यारंभ आदेशाची सुद्धा होत आहेत अशी जनसामान्यांमध्ये चर्चा आहे. आपल्या अमळनेरची शान असलेल्या दगडी दरवाजा चा कामाला कार्यरंभ आदेश देऊन देखील आज पर्यंत पूर्ण होत नाही हा देखील संशोधनाचा विषय आहे.  येणाऱ्या १० दिवसात जर युद्ध पातळीवर काम सुरू नाही झाले तर आम्ही उग्र आंदोलन छेडू याची नोंद घ्यावी अश्या आशयाचे निवेदन श्री पंकज चौधरी यांनी नपाच्या मुख्याधिका-यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.