रेशनकार्ड ऑनलाईन करून अन्न सुरक्षा योजनेत समावेश करणार - तहसिलदार लोक संघर्ष मोर्चाच्या मागणीची घेतली दखल

Friday, June 4, 2021

/ by Amalner Headlines
नागरिकांनी कागदपत्रे जमा करण्याचे केले आवाहन
----------------------------------------------------------------
              - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------
अमळनेर - लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५ मे २०२१ रोजी शासकीय योजनेत मिळालेल्या रेशनकार्डांना आँनलाईन करून अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्याबाबतचे निवेदन दिले होते. तहसिलदार मिलिंद वाघ यांनी लोक संघर्ष मोर्चाच्या मागणीची दखल घेतली असून तसे पत्राद्वारे म्हटले आहे.


काय म्हटले आहे पत्रात
अमळनेरचे तहसिलदार मिलिंद वाघ यांनी लोक संघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे व अन्य पदाधिकारी यांना दि. ३ जून २०२१ रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,आदिवासी कुटुंबाचे रेशनकार्ड ऑनलाईन करणेकामी रेशनकार्ड मधील सर्व सदस्यांचे आधारकार्डची झेरॉक्स प्राप्त होताच तात्काळ ऑनलाईन करता येईल व शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करणेकामी शासन निर्णय दि. २१ मे २०१८ नुसार विहीत नमुन्यात कार्डधारकांचे हमीपत्र सोबत रेशनकार्ड झेरॉक्स सादर केल्यास तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे पत्र दिले आहे. प्रशासनाने आमच्या मागणीची तात्काळ दखल घेतल्याने लोक संघर्ष मोर्चा तर्फे पन्नालाल मावळे यांनी तहसिलदार मिलिंदकुमार वाघ, नायब तहसिलदार संतोष बावणे यांचे आभार मानले आहेत.
आवाहन
तालुक्यात वाटप केलेल्या ७०० कार्डधारकांनी आपल्या रेशनकार्डची झेरॉक्स व त्या रेशनकार्डवर जेवढे व्यक्ती आहेत त्या सर्वांचे आधारकार्ड झेरॉक्स, विहीत नमुन्यात हमीपत्र व मोबाईल नंबर तात्काळ तहसिल कार्यालयात पुरवठा विभाग येथे जमा करावे असे आवाहन लोक संघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे यांनी केले आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines