-----------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याची तयारी शासकीय पातळीवर सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागास आमदार अनिल पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून १० लाखांचे साहित्य तालुका आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालय,पालिका रुग्णालय यांच्याकडे सुपूर्द केले आहे. आतापर्यंत आमदारांनी स्थानिक विकास कार्यक्रमातून एक कोटी रुपयांचा निधी कोरोनावर खर्च केला आहे.अॅटीजेन किटस् उपलब्ध
यावेळी कोविड १९ अँटीजेन चाचणीसाठी शहरी भागास ६ लाख व ग्रामीण भागासाठी ४ लाख असे एकुण १० लाख चाचणी किटस् उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्यापैकी शहरी भागासाठी एकुण ६७००० अँटिजेन किटस् आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना ग्रामीण रुग्णालय येथे सुपूर्द करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे, पालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, पालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास महाजन,डॉ.आशिष पाटील, डॉ.अतुल चौधरी विनोद कदम, प्रविण (भटु) पाटील, सचिन पाटील, ज्ञानेश्वर कुमावत, सुहास कोतकर आदी उपस्थित होते.

संभाव्य तिसरी लाट आणि उपाय योजना
अमळनेर तालुक्यात पहिली लाट संपली मात्र दुसरी लाट तीव्र स्वरूपात होती. त्यात एकाच कुटुंबातील अनेक जण एकाच वेळी रुग्णालयात दाखल होते. शहरातील ग्रामीण रुग्णालय, इंदिरा भवन अशा ठिकाणी वाढीव सोय करण्यात आली होती. तरीही दवाखाने फुल्ल होते. ऑक्सिजन सुविधा बेड, तपासणी साहित्य, यासह विविध साहित्य आमदार स्थानिक विकास निधी, पालिका, दानशूर व्यक्ती व विविध संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळाले. इतर साहित्य आमदार निधी यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले गेले.सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी, शासकीय डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी, पालिका कर्मचारी त्यामुळे तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात यश आले. आता तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील संभाव्य तिस-या लाटेचे संकेत लवकर मिळु शकतात व वेळेत उपाय योजना करुन साथ आजार वेळीच प्रतिबंध करणे शक्य होते. त्यामुळे अँटीजेन किटचा पुरवठा सद्यास्थितीला महत्वाचा आहे.
शहरात तपासणी सुरूच
शहरी भागात दररोज स्टेट बँकेजवळ, खाजगी प्रवासी बसेस थांब्यावर (कलागुरु मंगल कार्यालय जवळ),ग्रामीण रुग्णालय,रेल्वे स्टेशन येथे तसेच फिरत्या पथकाकडुन बालेमिया, तिरंगा चौक येथे अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत.
No comments
Post a Comment