अमळनेर येथील ७० वर्षीय आजीची कोरोनावर मात डॉक्टर्स व रूग्णालयाच्या स्टॉफने टाळ्या वाजवून दिल्या शुभेच्छा

Saturday, June 5, 2021

/ by Amalner Headlines
-------------------------------------------------------------
                   - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------
अमळनेर -
शहरातील एका सामान्य कुटुंबातील ७० वर्षीय महिलेने कोरोना आजारावर मात केली आहे. त्या खाजगी रूग्णालयात उपचार घेत होत्या. रूग्णालयाचे डॉक्टर व सर्व स्टॉफने टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा दिल्या.
         अमळनेर नपाच्या माजी आरोग्य सभापती तथा विद्यमान नगरसेविका राधाबाई संजय पवार यांच्या सासुबाई श्रीमती सुशिलाबाई पंडीत पवार (वय ७०वर्ष) रा. सुभाष चौक जुना पारधीवाडा अमळनेर, यांना दि. २६ मे रोजी श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने सुशिलाबाई यांना त्यांची मुले मुलगा संजय पवार व बालीक पवार यांनी अमळनेर मधील श्री दत्त हाँस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉ. किरण बडगुजर यांनी तपासणी केली असता आँक्सिजन पातळी ५८ होती व त्यानंतर सिटी स्कॅन करण्यात आला त्यात स्कोअर हि १८ आल्याने पवार कुटूंबाची चिंता वाढली होती.
परंतु डॉ.किरण बडगुजर यांनी पवार कुटूंबाला धिर देत आँक्सिजन लावून औषधोपचारासह शर्तीचे प्रयत्न करून दि. ४ जुन रोजी ९ दिवस कोरोनाशी लढा देत आजीने कोरोनाला हरवले. आजी सुशीलाबाई यांची आँक्सिजन पातळी ९८ पर्यन्त येऊन आजीबाई बऱ्या झाल्याने त्यांना सायंकाळी डॉ.किरण बडगुजर यांच्यासह श्री दत्त हाँस्पिटलचा पुर्ण स्टॉफ यांनी आजी सुशिलाबाई पवार यांना सुखद आरोग्याच्या शुभेच्छा देत टाळ्या वाजवत कोरोनाला हरवल्याच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पवार कुटूंबा सोबत लोक संघर्ष मोर्चा तथा आदिवासी पारधी विकास परिषदेचे पन्नालाल मावळे हि होते पवार कुटूंबाने डॉ.किरण बडगुजर सह पुर्ण स्टॉफचे आभार मानले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines