----------------------------------------------------------------
अमळनेर - दि. २ जुलै २०२१ रोजी लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ. पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी कोव्हीड-१९ अंतर्गत अमळनेर न.प. अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केल्यामुळे तसेच कोव्हीड-१९ उपाय योजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवसाचा पगार स्वखुषीने जमा करण्याच्या कार्यास हातभार लावला हे लक्षात घेऊन लोकनियुक्त नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी नगर परिषदेतील एकूण ५०४ अधिकारी व कर्मचारी यांचा ओरिएंटल इन्शुरन्स लिमिटेड मार्फत प्रति वर्ष प्रति कर्मचारी १२०/- रुपये असा ३ वर्षासाठी एकूण १,८१,०००/- रुपयांचा धनादेश देऊन अपघात विमा काढला. त्यात अपघातात मरण पावल्यास २ लक्ष रुपये व कायमस्वरूपी विकलांगता आल्यास १ लक्ष रुपये असे लाभ आहेत. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता सौ.पुष्पलता साहेबराव पाटील,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,प्रशासन अधिकारी संजय चौधरी,कर्मचारी संघटना अध्यक्ष अनिल बेंडवाल, सोमचंद संदांशिव, राजू चंडाले, प्रसाद शर्मा यांचेसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नगरपालिका व नगराध्यक्षा यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
No comments
Post a Comment