आजचे दिन विशेष ७३ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेबद्दल सोशल मिडीयात प्रसिद्ध झालेला हा वृत्तांत अमळनेरातील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या अर्धपुतळ्याचा आज वर्धापन दिन

Friday, July 9, 2021

/ by Amalner Headlines

-------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
---------------------------------------------------------------
अमळनेर - येथील नपाने दि.१०/०७/१९४९ रोजी देशभक्त सुभाषचंद्र बोस यांचा अर्ध पुतळा लोकल बोर्ड विहिरी जवळच्या चौकात बसविला. त्या पुतळ्याचा अनावरण समारंभ रविवारी ५:३० वाजता अमळनेरचे सुप्रसिद्ध वकील बाबासाहेब भालेराव (माजी नगराध्यक्ष) यांच्या हस्ते झाला. समारंभास अमळनेरातील प्रतिष्ठीत मंडळी नगरपालिकेचे सभासद हजर होते. नगरपरिषद बोर्डाचे अध्यक्ष मोरोपंत ब्रह्मे यांनी आपले विचार मांडून त्या दिवसापासून या चौकाला सुभाष चौक व स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याला नेताजी रस्ता असे नाव दिल्याचे जाहीर केले. या समारंभाचे अध्यक्ष बाबासाहेबांनी सुभाषचंद्र बोस यांचे पावित्र्य, त्याग, धडाडी, देशभक्ती बद्दल माहिती सांगून अशा महान आत्म्यांचे पुतळे हे समाजाला व नवीन पिढीला मार्गदर्शन करणारे व त्यांचे पावित्र्याचा उज्वल इतिहास डोळ्यासमोर ठेवण्यास कारणीभूत कसे होतात याविषयी माहिती सांगितली. पाश्चिमात्य देशात विशेषता: रोम शहरात निरनिराळ्या कलांचे प्रतिक म्हणून पुतळे उभारण्याची पद्धत आहे. याबद्दल त्यांनी माहिती सांगितली सदरचा पुतळा तयार करण्याचे काम प्रताप हायस्कूलमधील कलाशिक्षक श्री पोतदार यांनी केले आहे. पुतळा फारच चांगला झालेला आहे.
आकर्षक पुतळा बनवल्याबद्दल पोद्दार यांना त्यांच्या कलेचे गौरवार्थ अध्यक्षांच्या हस्ते चांदीचा करंडक देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. खानदेशच्या इतिहासात प्रथमच मुख्य चौकात अशारीतीने सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याचे श्रेय नगर परिषदेला देण्यात येते. लोकांना सुभाषचंद्र बोस यांच्या आदर्श सतत दृष्टी समोर ठेवण्यात चालना दिली याबद्दल नगर परिषदेच्या अध्यक्षांनी अंमळनेर जनतेस उपकृत केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले व नंतर नंतर वंदे मातरम हे गीत होऊन समारंभ चा समारोप करण्यात आला निश्चीतच नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा अमळनेर नगरीचा एक वैभव म्हणून आदर्श म्हणून त्याकडे आजही अमळनेरचे नागरी सन्मानाने बघतात नेताजींच्या विचारांना कृतीला विनम्र अभिवादन.
(वरील लेख लिहीणा-या लेखकाचे आभार - सोशल मिडीयातून साभार)

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines