----------------------------------------------------------------
अमळनेर - येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निधीतून अमळनेर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये चंद्रकांत पाटील सर ते गोसावी सर यांच्या घरापर्यंतच्या रस्ता कॉक्रीटीकरणाचे भूमिपूजन अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी अंदाजित १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व अमळनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील, दीपक पाटील, प्रा.अशोक पवार सर, जे.के.पाटील, अँड.यज्ञेश्वर पाटील हे उपस्थित होते. प्रभागाच्या नगरसेविका अँड.चेतना पाटील यांच्या प्रयत्नाने व सततच्या पाठपुराव्यामुळे रस्ता काँक्रिटकरणाचे काम मार्गी लागणार आहे.यावेळी प्रभाग क्रमांक ८ मधील स्थानिक नागरिक,मंडेवल काका,भैसे साहेब,कदम काका,गोसावी सर, खैरनार सर,रविंद्र पाटील सर, सुहास भाऊ, अँड.जे.यु.बडगुजर व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments
Post a Comment