लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी आमदार अनिल पाटील, मा.आ.साहेबराव पाटील यांनी केले अभिवादन

-----------------------------------------------------------------
                                 - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------
अमळनेर - थोर विचारवंत, कवी, कलावंत, प्रबोधनकार, साहित्यिक व समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेर शहरातील धुळे रोडवर असलेल्या  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला आमदार अनिल भाईदास पाटील व मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
                  यावेळी बहुजन रयत परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे, तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ.व्ही.एस.तुंटे, समता समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे,आदिवासी एकता परिषदेच्या जयश्री साळुंखे, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष प्रविण बैसाणे तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब, आत्माराम अहिरे, अजय भामरे, मांडळ येथील ग्रा.पं.सदस्य मंगलदास कांबळे, राजू कांबळे, जितू कढरे, बहुजन रयत परिषदेचे हरीश्चंद्र कढरे, नारायण गांगुर्डे, अनिल मरसाळे, किरण संदानशिव, राकेश खैरनार, सोनू संदानशिव यांच्या सह विविध सामाजिक संघटनांनी अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.