--------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोनाची रूग्ण संख्या कमी - अधिक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात नवीन निर्देश जारी केले आहेत. त्यात स्थानिक पातळीवर दर आठवड्यात शनिवार व रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमळनेर येथे आज या नियमानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद होती. या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणा-यांवर नपाच्या पथकाने पोलीसांच्या सहकार्याने दंडात्मक कारवाई केली आहे.यांच्यावर झाली कारवाई
आज नपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने श्री लक्ष्मीनारायण,राज इलेक्ट्रॉनिक्स,अलमदार स्टोअर्स,नईम पठाण,ओप्पो मोबाईल,उज्वल कलेक्शन,न्यू ओम कलेक्शन,श्री समर्थकृपा ज्वेलरी,साई सिलेक्शन,शारदा जनरल स्टोअर्स या दुकानदारांना दंडात्मक कारवाई केली आहे.
या कारवाईत अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल व सहकारी यांच्यासह पो.कॉ. संजय पाटील,पो.कॉ.सुनिल पाटील व त्यांच्या सहका-यांनी सहभाग घेतला. या कारवाईत एकूण ५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.
No comments
Post a Comment