संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सामूहिक व व्यक्तीगत सुरक्षितता महत्वाची सिंधी कॉलनीतील कॉर्नर सभेत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या रहिवाशांना महत्वाच्या सुचना

Monday, July 19, 2021

/ by Amalner Headlines
--------------------------------------------------------------
                       - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------------
अमळनेर -  मागील काही दिवसात अमळनेर शहर व परिसरात चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील नागरी वस्तीत रहिवाशांच्या सहकार्यातून सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. सिंधी कॉलनी शहरापासून लांब असल्याने पोलीसांना स्थानिक रहिवाशांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. पोलीस प्रशासन आपल्या सोबत आहेच पण आपणही एकत्रितपणे खबरदारीच्या उपाय योजना करा. व्यक्तीगत व सामूहिक या दोन्ही सुरक्षा महत्वाच्या आहेत त्यासाठी पोलीसांना सहकार्य करा असे आवाहन अमळनेरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सिंधी कॉलनीतील कॉर्नर सभेत केले.सुरक्षिततेबाबत जाहीर आवाहन करून रहिवाशांना महत्वाच्या सुचना देण्यात आल्या.

             अमळनेर शहरातील चोपडा रोड वरील सिंधी कॉलनीत माताजी मंदीर हॉलमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लबडे, पो.ना डॉ.शरद पाटील,पो.का.सुनिल पाटील,पुरुषोत्तम पाटील,मधुकर पाटील यांचीही उपस्थिती होती.

मान्यवरांचे स्वागत
           कार्यक्रमाच्या आधी सर्व मान्यवरांनी माताजी मंदीरात जाऊन दर्शन घेतले. सभेच्या  सुरूवातीस पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व सहका-यांचे सिंधी समाज बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर पो.कॉ. पुरुषोत्तम पाटील,पो.ना.डॉ.शरद पाटील व सपोनि राहुल लबडे यांनी नागरिकांना सामूहिक व व्यक्तीगत सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाच्या सुचना दिल्या. आपला भाग शहरापासून लांब असल्याने आपण अधिक सावधानता बाळगावी अशी सुचना केली.
पोलीस यंत्रणा आधीच सक्रीय
            अमळनेर शहरात मागील काळात लहान - मोठ्या चो-या होण्याचे प्रमाण वाढले होते. वाहने चोरी होणे, घरमालक गावाला गेला असल्याची संधी साधून घरातील ऐवजावर डल्ला मारणे,बॅंकेतून रक्कम काढून नेणा-या ग्राहकांना टार्गेट करून रक्कम घेऊन पळ काढणे यासारख्या घटना घडत आहेत. यापुढे अशा घटना घडणार नाहीत यादृष्टीने काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृतीपर सुचना देणारे बॅनर रिक्षावर लावण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. रिक्षावर डिजीटल बॅनर लावून या  माध्यमातून पोलीस यंत्रणा आधीच सक्रीय झाली आहे.
पोलीस निरीक्षकांनी काय दिल्या सुचना

सीसीटीव्ही लावण्याचे करा नियोजन

                  चोरी करण्याआधी ते घर,दुकान व परिसराची चोरट्यांकडून पाहणी करण्यात येत असते. त्यामुळे सुरक्षितता म्हणून आपले दुकान,गोडाऊन व घराच्या बाहेर दोन्ही बाजूंनी सुमारे ५० मीटर अंतर कव्हर होईल असे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. नागरिकांनी व्यक्तीशः अथवा येथील पूज्य सिंधी जनरल पंचायतीने पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर लावण्याचे नियोजन करावे असे आवाहन पो.नि. श्री हिरे यांनी केले.
सेफ्टी डोअर बसवा
     दिवसा घरास कुलूप असल्याचे पाहून चोरटे त्याठिकाणी रात्री चोरी करत असतात. त्यामुळे घराला बाहेरून कुलूप लावलेले आहे की नाही हे समजू नये असे सेफ्टी डोअर बसवावे.
रोख रक्कम व दागिने लॉकरमध्ये ठेवा.....
       नागरिकांनी बाहेरगावी जातांना रोख रक्कम व मौल्यवान दागिने बॅंकेत लॉकरमध्ये ठेवावेत.कारण चोरटे घरात प्रवेश केल्यावर आधी कपाट तोडतात.
......अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवा
        जर दागिने व रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवणे शक्य नसेल तर घरात चोरट्यांना सहज सापडणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावेत.

सीसीटीव्हीची आवश्यकता
       नवीन कॉलनीतील नागरिकांनी मुख्य रस्त्यावर सामुहिक वर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. दुकाने व घरांच्या सुरक्षिततेसाठी मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी ५० फुट पर्यंत कव्हर लावावेत. अनुचित घटना घडल्यास या सीसीटीव्हीमुळे पोलीसांना तपासासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होऊ शकते. चोरीच्या घटना रोखण्यासाठी आपण सीसीटीव्हीचा वापर करणार आहोत. नागरिकांनी याबाबत शंका न ठेवता पोलीसांना सहकार्य करावे. 
पथदिवे व लाईट सुरू ठेवा
      शहरातून कॉलनीकडे जाणा-या रस्त्यावर मुख्य रस्ता,गल्ली अथवा कॉलनीतील पथदिवे बंद असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असतात. त्यामुळे नपाने च घराबाहेरील लाईट सुरू ठेवावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेले पथदिवे सुरू असल्याची खात्री करावी.
             अशा महत्वाच्या सुचना  पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी रहिवाशांना दिल्या. 
या पदाधिका-यांची उपस्थिती
                  यावेळी पुज्य सिंधी जनरल पंचायत अध्यक्ष दिलीप जग्मलानी,दिलीप लुल्ला,राजु वाधवानी,सुरेश बठेजा,राम मलकानी,शंकर वाधवानी,गोविद आहुजा,प्रकाश जग्यानी,संजय बितराई,जितु डिंगराई,गोवर्धन डावरानी,गुलाब मास्टर आहुजा,विजु डिंगराई,विजय (छोटु) अंदानी,मुकेश काठवाडी,घनश्याम थदानी,जेठानंद तोलानी,घनश्याम बालचंदानी, महेश डिंगराई ,अमळनेर हेडलाईन्स न्युजचे संपादक गुरुनामल बठेजा उपसंपादक रोहीत बठेजा आदींसह सिंधी समाज बांधव उपस्थित होते. पोलीसांनी राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines