---------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील मांडळ येथे पांझरा नदी पात्रात अवैधरित्या गौण खनिज वाळू वाहतूक करणारे धीरज पाटील यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (ट्रॅक्टर क्र. MH१९ AN९००७) अमळनेर महसुल विभागाच्या पथकास आढळून आले. सदर ट्रॅक्टर तहसिलदार यांच्या मार्गदर्शनानुसार अमळनेर तहसिल कार्यालय येथे मुद्देमालासह जमा करण्यात आले. यांनी केली कारवाई
या पथकात तलाठी तीलेश पवार,सचिन बमनाथ,धीरज देशमुख,पी.एस. मसोनवणे,जी. आर. महाजन, प्रथमेश पिंगळे, जितेंद्र पाटील, हर्षवर्धन मोरे आदी सहभागी होते.
No comments
Post a Comment