‘ब्रेक दि चेन’ - राज्य आता अनलॉक,नवीन नियम जाहीर नागरिक व व्यावसायिकांना दिलासा देणारा निर्णय

----------------------------------------------------------------
                           - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------
मुंबई - राज्यात काही जिल्ह्यामध्ये कोरोनाची रूग्ण संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने आज ‘ब्रेक दि चेन’ मोहिमे अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये नियम शिथील करण्यात आले असून वीकेंड लॉकडाऊनमध्येही काहीसा दिलासा देण्यात आला आहे.
दि.४ पासून अंमलबजावणी
           येत्या दि. ४ ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होईल. नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने सर्व सामान्य नागरिकांप्रमाणेच दुकानदार आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. नियम शिथिल झाले असले तरी कोरोना प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून मास्कचा वापर,सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
काय आहेत आदेश
                मात्र,या नियमावली अंतर्गत राज्यातील रुग्णसंख्या अधिक असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये लेवल ३ चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत .
निर्बंध जारी असलेले जिल्हे
               यामध्ये पुणे,सांगली, सातारा, कोल्हापूर,  बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यास जुन्या नियमावलीतून वगळण्याबाबतचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता जनतेने सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहेत नवीन नियम

- सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली ठेवण्यास परवानगी.

- शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली राहणार 

-  रविवार वगळता इतर दिवशी मॉल्स देखील खुले राहणार.

- रविवारी फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरू रहातील.

- सर्व खासगी आणि शासकीय कार्यालये ही संपूर्ण क्षमतेने खुली राहणार.

- सर्व उद्याने, मैदाने खुली राहणार
 
- हॉटेल्स दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने खुली राहतील. तर विकेंडला केवळ पार्सल सेवा सुरू राहील.

- ब्युटी पार्लर, स्पा, हेअर सलून, जिम,योगा क्लासेस सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ५०  टक्के क्षमतेने खुले राहणार, रविवारी पूर्ण बंद राहतील. 

- सिनेमागृह, मल्टीप्लेक्सना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
नियमांचे पालन आवश्यक
       याप्रमाणे नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक,लहान दुकानदार व व्यावसायिकांना मोठाच दिलासा मिळणार आहे. पण कोरोना आजाराच्या प्रतिबंधनात्मक उपाय योजनांचे देखील पालन करावे. घराबाहेर पडतांना मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन शासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.