पोलीस निरीक्षकांचा शब्द ठरतोय खरा - अवैध धंदे जाताहेत कोमात
--------------------------------------------------------------
अमळनेर - येथील हिगोणा शिवारात बोरी नदीच्या अवैध पध्दतीने वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन अमळनेर पोलीसांनी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी जोमात असलेले अवैध धंदे कोमात पाठवेन असा दिलेला शब्द आता खरा होतांना दिसत आहे.कशी झाली कारवाई
अमळनेर जवळील हिंगोणा शिवारातील बोरी नदी पात्रात आज (दि.२ रोजी) दोन स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर चोरटी वाळू वाहतूक करत आहेत अशी गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे यांना मिळाली. त्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनचे पथकातील अंमलदार अरुण बागुल व विलास बागुल यांनी बोरी नदीच्या पात्रात जाऊन दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
पोलीसांनी केला गुन्हा दाखल
पंचांसमक्ष लाल रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर यांच्या ड्रायव्हरचे नाव विचारले असता ट्रॅक्टरचे मालक अमोल नारायण शिंदे व चालक रवींद्र युवराज मोरे दोन्ही रा.रत्नापिंप्री,ता.पारोळा तसेच निळ्या रंगाचे स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरचे मालक अमळनेर येथील दिपक जगन्नाथ भोई व ड्रायव्हर गोविंद महादू भिल असे सांगितले. दोन्ही ट्रॅक्टर्स ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्यावर अमळनेर पोलीसात स्टेशन येथे गु. र. नंबर ३२७/२०२१ भादंवि कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

