पारोळ्यात ५ लाखाचा गुटखा जप्त - तालुक्यातील पहिलीच मोठी कारवाई मुद्देमालासह आरोपीस अटक गुन्हा दाखल

---------------------------------------------------------------
                  - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------
अमळनेर - पारोळा – धरणगाव मार्गावर असलेल्या पिंपरखेड मारुती मंदिराजवळ दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांना वाहन तपासणी करीत असतांना सुमारे ३ लाख ६६ हजाराचा गुटखा आढळून आला. मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
कुठे झाली कारवाई
                 पारोळा तालुक्यातील पिंपरखेड मारूती मंदीराजवळ दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाहन तपासणी करीत असतांना धरणगाव येथील सतीश रमेश पाटील यांच्या टेम्पोच्या तपासणीत ३ लाख ६६  हजार रुपये किंमतीचा गुटखा व दीड लाख रुपये किमतीचा टेम्पो मिळून आल्याने आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
यांनी केली कारवाई
              पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, सपोनि निलेश गायकवाड, हेड कॉन्स्टेबल बापू पारधी, सत्यवान पवार,महेश पाटील हे पारोळा धरणगाव रस्त्यावरील पिंपरखेड मारुती मंदिराजवळ सरकारी पोलीस गाडी साईडला लावून गाड्यांची तपासणी करीत असतांना धरणगाव कडून येणारा महिंद्रा टेम्पो क्रमांक एम एच १९ बी. एम. ४९५७ वरील चालक सतीश रमेश पाटील ( वय ३८) राहणार राम मंदिर समोर, धरणगांव याची तपासणी केली असता गाडीत विमल गुटखा, तंबाखू सुगंधी गुटखा असे एकूण ८ गोणपाट व ८गोणी भरलेले असे एकूण तीन लाख ६६ हजार ८० रुपयाचा गुटखा तर १ लाख ५० हजाराचा टेम्पो असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंतची पारोळ्यात झालेली ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई आहे.
मुद्देमाल जप्त,गुन्हा दाखल
         सदर गुटखा हा धरणगाव येथील भटू मराठे यानी पारोळा येथील कैलास चौधरी याच्याकडे पोहोच करण्यास सांगितले. त्यापोटी १ हजार रुपये भाडे देण्यात आले असल्याचे टेम्पो चालक सतीश पाटील याने पोलिसांना सांगितले. याबाबत पोलीस नाईक प्रवीण रमेश पारधी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून सतीश रमेश पाटील याच्या विरुद्ध शासनाने गुटखा बंदी केलेली असताना देखील अवैधरित्या गुटखा वाहतूक करतांना मिळाल्याने अन्नसुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.