हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्ण उघडले तापी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगावी - आवाहन

----------------------------------------------------------------
                     - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------
जळगाव -  हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे १४ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी  ७ वाजता धरणातून तापी नदीपात्रात ४०८९४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
            धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.