अमळनेर - येथील नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे ७ व्या वेतन आयोगाच्या थकीत फरकाची रक्कम देण्यात यावी अशी मागणी दि. २ जुलै २०२१ रोजी संघटनेने केली होती. परंतु अद्याप पावेतो फरकाची रक्कम दिली नसल्यामुळे आज दि.२४ ऑगस्ट२०२१ रोजी पुन्हा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी निवेदन स्विकारले व लवकरच रक्कम अदा करण्यात येईल असे सांगितले.
शनिवार पर्यंत रक्कम अदा
थकीत फरकाची रक्कम त्वरित देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय नगरपालिका मजदूर महासंघ व भारतीय कर्मचारी महासंघ (इंटक) या दोन्ही संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी श्री सरोदे व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये असल्याने उप मुख्याधिकारी श्री संदीप गायकवाड यांना मुख्याधिकारी दालनाच्या बाहेर निवेदन दिले असता शनिवार पर्यंत फरकाची रक्कम अदा केली जाईल असे सर्वांसमक्ष आश्वासन दिले असून या बाबत सर्व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून आभार मानले.
यांनी दिले निवेदन
या प्रसंगी सोमचंद संदानशिव (सरचिटणीस,भारतीय कर्मचारी महासंघ) अविनाश संदानशिव(सरचिटणीस राष्ट्रीय नगरपालिका मजदूर महासंघ) अॅड. शकील काझी(अध्यक्ष राष्ट्रीय नगरपालिका मजदूर महासंघ),ईश्वर पाटील, अशोक संदानशिव,प्रसाद शर्मा(भारतीय कर्मचारी महासंघ इंटक), किरण संदानशिव,साजिद शेख,संजय बिऱ्हाडे,शंकर छाबडीया,जे.व्ही. महाजन,गोपाल बिऱ्हाडे, ज्ञानेश्वर संदानशिव,आकाश संदानशिव,
चंद्रकांत शिंगाणे व इतर सर्व कर्मचारी हजर होते. या प्रसंगी नगरसेवक श्री नरेन्द्र संदानशिव सह सेवानिवृत्त कर्मचारी देखील उपस्थित होते
