नपा प्रभाग क्र.१४ च्या ओमशांती नगर मधील नागरिकांचे होताहेत हाल
नगरसेवक व नपा प्रशासन लक्ष देईल का ?
------------------------------------------------------------------
अमळनेर - शहराच्या कॉलनी भागातील नपा प्रभाग क्र.१४ मधील ओमशांती नगर मधील नागरिकांना ये - जा करण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही. आधीच्या पाऊसात खराब झालेल्या रस्त्याची नुकत्याच झालेल्या पाऊसामुळे पुरती वाट लागली आहे. आता तेथे रस्ता राहिलेला नसून गाराच गारा आढळून येत आहे. त्यामुळे कॉलनीवासियांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रभागाच्या नगरसेवकांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्याची भावना नागरिकांची झाली आहे. शहरात मागील काही महिन्यात भुयारी गटारींची कामे झाली.यामुळे सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.त्यातच कॉलनीतील कामे ब-याच ठिकाणी अपूर्णावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

गटारीचे अपूर्ण काम - रस्ता खराब
शहरातील प्रभाग क्र. १४ मधील ओमशांती नगर मधील भुयारी गटारींचे अपूर्ण आहे व सध्या काम बंद आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पाऊसाने येथील रस्ते अतिशय खराब झाले होते. नागरिकांना ये - जा करणे अवघड झाले असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पाऊसाने लागली रस्त्याची वाट
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊसाने तर रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. गाराच गारा झाल्याने वाहने फसू लागली आहेत. नागरिकांना पायी चालणे जिकिरीचे बनले आहे. स्थानिक नगरसेवकांना या प्रश्नाचे गांभीर्यच नसल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
स्थानिक नगरसेवक व नपा प्रशासनाने कॉलनीतील या अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

