हाशमजी प्रेमजी शॉपिंगमध्ये तरूणाचा खून पोलीसांनी अवघ्या काही तासात आरोपीस केली अटक

--------------------------------------------------------------
                             - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------
अमळनेर -  येथील स्टेशन रोडवरील हाशमजी प्रेमजी व्यापारी संकुलात काल रात्री एका तरूणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी सदर घटनेतील आरोपीचा तात्काळ शोध घेत आरोपीस ताब्यात घेतले आहे.
             याबाबतची अधिक माहिती अशी की,नगर परिषदेच्या मालकीचे हाशमजी प्रेमजी व्यापारी कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर भोईराज आईस्क्रीम पार्लर या दुकानाजवळ एक तरूणाचा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस आल्यावर सदर तरूण प्रकाश दत्तू चौधरी उर्फ बापू चौधरी (रा. जुना पारधी वाडा,अमळनेर) असल्याची  ओळख पटली. मयताच्या वडीलांना घटनेची माहिती देण्यात आली. दत्तात्रय वंजी चौधरी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भाग ५ गुन्हा रजि.नं. ३६१/२०२१,भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तात्काळ लागला तपास
         सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या तपासासाठी दोन पथके तयार केले. एका पथकास परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास कामी तर दुस-या पथकास आरोपीच्या तपासासाठी रवाना केले.
आरोपीस केली अटक
          सदर प्रकरणात संशयित म्हणून कैलास शिंगाणे(भोई ) याचे नाव समोर आल्यावर पोलीस कॉन्स्टेबल सुनिल हटकर व मिलींद भामरे यांच्या पथकाने माग काढत संशयित आरोपी कैलास शिंगाणे (भोई )यास चोपडा येथून ताब्यात घेतले. त्यास अमळनेर येथे आणले. पोलीसांनी  विचारपूस केली असता त्याने सदर खून केल्याची कबुली दिली.
केबल व्यवसायातील आर्थिक व्यवहार ठरले कारण
       केबल टी.व्ही. व्यवसायात काम देण्यासाठी कैलास शिंगाणे (भोई ) याने मयत प्रकाश याच्याकडून एक लाख रुपये घेतले होते. पण कामही दिले नाही व रक्कमही परत केली नाही यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता असे मयताच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे. या आर्थिक व्यवहारावरून सदर खून झाला असल्याचे दिसून येत आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य
   या घटनेतील तपासकामी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे,उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राकेशसिंग परदेशी हे पुढील तपास करीत असून त्यांना पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, सहाय्यक फौजदार साळुंखे,सुनिल हटकर,किशोर पाटील,भटूसिंग तोमर,डॉ.शरद पाटील,
विसावे,पो.ना.मिलींद भामरे,दिपक माळी,पो.कॉ.रवि पाटील,अमोल पाटील,राहुल चव्हाण व जळगाव येथील फॉरेन्सिक टीमने सहकार्य केले. या घटनेचा तातडीने तपास करून आरोपी जेरबंद केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी अमळनेर पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.